India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा त्रास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना या संघाचा अष्टपैलू खेळाडू जखमी झाल्याने तो किवी संघाविरुद्ध खेळणार नाही, तर दुसरीकडे त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात होते. आता तोही जखमी झाला आहे, तर इशान किशनलाही मधमाशीने चावा घेतला आहे.

सूर्यकुमार यादवच्या हाताला झाली दुखापत –

सूर्यकुमार यादवच्या दुखापतीनंतर तो न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही. शनिवारी सराव सत्रादरम्यान सूर्यकुमार यादवला उजव्या हाताच्या मनगटात दुखापत झाली. स्टार फलंदाज सूर्या भारताचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघूसोबत सराव करत होता. त्यानंतर त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्यावर पट्टी बांधली आणि हसत हसत प्रशिक्षणातून बाहेर पडला. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना या दोघांसाठी कठीण दिसत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला हार्दिक पांड्याचा पर्याय निवडावा लागेल आणि त्यासाठी टीम इंडियाकडे सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोन पर्याय आहेत, पण इशान किशनलाही मधमाशीने चावा घेतला आहे. त्यामुळे हे दोघे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – NED vs SL, World Cup 2023: नेदरलँड्सच्या फलंदाजांनी मोडला ४० वर्ष जुना भारताचा विक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे

प्रशिक्षक राहुल द्रविडने पांड्याबाबत दिली अपडेट –

सामन्याच्या एक दिवस आधी, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत पांड्याबाबत अपडेट दिली. ते म्हणाले, ‘हार्दिक पंड्या आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, जो प्लेइंग इलेव्हनमध्ये चांगला संतुलन निर्माण करतो. आम्ही सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्यावर काम करू. आमच्याकडे फक्त १४ खेळाडू असतील, यामधून प्लेइंग इलेव्हनची निवड करावी लागेल.’

प्रशिक्षक द्रविड पुढे म्हणाले, ‘तथापि, आमच्या सर्वोत्तम खेळण्यावरही परिणाम होईल. गेल्या ४ सामन्यांमध्ये जशी स्थिती होती, तशी ती असणार नाही.’ बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गोलंदाजी करताना चेंडू अडवताना पांड्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो जखमी होऊन मैदानाबाहेर गेला.

विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.