Suryakumar Yadav Shares Photo From Hospital: सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दरम्यान कसोटी संघाचा भाग नसलेले खेळाडू आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. त्याचप्रमाणे भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील पत्नी देविशासह पॅरिस आणि लंडनमध्ये फिरताना दिसला. पण त्यानंतर अचानक त्याने सर्जरी झाल्याचा फोटो शेअर केला आहे.

आयपीएल २०२५ नंतर सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी पॅरिसला फिरायला गेल्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यानंतर दोघेही लंडनमध्ये फिरताना दिसले. सूर्याची पत्नी देविशा हिने तिचं युट्युब चॅनेल नुकतंच ओपन केलं असून त्यावर तिने या सहलीचे दोन शॉर्ट व्हीडिओ शेअर केले आहेत. यानंतर सूर्यकुमारने अचानक जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाल्याचा फोटो शेअर केला.

सूर्यकुमार यादवच्या दुखापतीवर जर्मनीच्या म्यूनिच येथे शस्त्रक्रिया पार पडली. त्याला स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास होत होता. सूर्याने रुग्णालयाच्या बेडवरून त्याचा फोटो शेअर केला आणि शस्त्रक्रियेबाबत अपडेट दिले. त्यांने सांगितलं की त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. देविशा शेट्टीने देखील सूर्याचा हॉस्पिटमधील फोटो शेअर करत तो ठिक असल्याची माहिती दिली आहे.

Devisha Shetty Instagram Story After Suryakumar Yadav Surgery
सूर्यकुमार यादवचा सर्जरीनंतरचा फोटो (फोटो-@devishashetty)

सूर्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “लाईफ अपडेट: ओटीपोटाच्या उजव्या भागाच्या येथील स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात झाली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मी आता रिकव्हरीच्या मार्गावर आहे. मैदानावर परण्यासाठी उत्सुक आहे.”

सूर्यकुमार यादवच्या दुखापतीवर यापूर्वीही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याआधीही त्याच्या दुखापतींवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे आणि प्रत्येक वेळी तो त्याच ताकदीने मैदानात परतला आहे. सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-२० संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने त्याने लवकर पुनरागमन करणं ही संघासाठी महत्त्वाची गोष्ट असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शस्त्रक्रियेपूर्वी, सूर्या शेवटचा आयपीएल २०२५ आणि मुंबई टी२० लीगमध्ये खेळला होता. आयपीएलमध्ये सूर्याने १६ डावांमध्ये ७१७ धावा केल्या, ज्यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश होता. सूर्या २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने २०१२ मध्ये या फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्यानंतर तो ४ वर्षे केकेआरकडून खेळला.