Syed Saba Karim Reveals About MS Dhoni: भारताचा माजी कर्णधा महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ २०१६ मध्ये रिलीज झाला होता. त्या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटाचे निर्माते देखील धोनीशी संबंधित प्रत्येक ‘अनटोल्ड’ कथा कव्हर केल्याचा दावा करू शकत नाहीत. धोनीबाबत अजूनही अनेक गुपिते आहेत, जी कोणालाच माहीत नाहीत. भारताचा माजी कीपर-फलंदाज सय्यद सबा करीमने धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे.
माजी निवडकर्ता सय्यद सबा करीम यांनी धोनीच्या कारकिर्दीत कोणते टर्निंग पॉइंट राहिले याबद्दल सांगितले. सबा करीमने ‘जिओ सिनेमा’वरील कॉमेंट्री बॉक्समध्ये याचा खुलासा केला. बिहारमध्ये रणजीचा सिलेक्टर झाल्यानंतर सबा करीम धोनीला भेटले, तेव्हा धोनी बिहारकडून रणजी खेळायचा.
पॉवर हिटर एमएस धोनीची पहिली छाप –
माजी निवडकर्ता म्हणाले, “माझी गोष्ट खूपच मनोरंजक आहे. मी धोनीला भेटलो तेव्हा, तो रणजीमध्ये दुसऱ्या वर्षात होता. तो बिहारकडून खेळायचा. मी त्याला फलंदाजी करताना पाहिलं, आणि मला अजूनही आठवतं की तो फलंदाजी करत असताना त्याच्याकडे ती उत्तम प्रतिभा होती. जी आपण नंतर पाहिली, एखादा फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज मोठमोठे फटके खेळत होता. विकेटकीपिंगसाठी जे फूटवर्क असायला हवे होते, तेही थोडे कमी होते.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही त्याच्यासोबत त्यावेळी काम केले होते आणि तेव्हा त्याला जे शिकवले गेले ते त्याला अजूनही आठवते. आम्ही बोलायचो तेव्हा तो त्याबद्दल सांगायचा. एमएसच्या कारकिर्दीतील हा एक टर्निंग पॉइंट होता, जिथे तो खरोखरच पुढे चालला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये, आम्ही त्याला डावाची सुरुवात करु दिली, कारण त्याची फलंदाजी खूप मजबूत होती आणि तो पटकन धावा करत असे.”
सबा करीम यांनी पुढे सांगितले की, भारत-अ दौऱ्यानंतर राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांनी धोनीची निवड कशी केली. ते म्हणाले. “दुसरा टर्निंग पॉईंट होता भारत ‘अ’, पाकिस्तान ‘अ’ आणि केनिया यांच्यातील तिरंगी मालिका. दिनेश कार्तिक राष्ट्रीय संघात सामील होत असल्याने धोनीला खेळायला मिळाले. जिथे धोनीने चांगले विकेटकीपिंग केले आणि फलंदाजीबद्दल तर विचारुच नका! आम्ही पाकिस्तान अ विरुद्ध दोनदा खेळलो आणि त्यांनी मालिकेत चांगली फलंदाजी केली.”
हेही वाचा – The Hundred Women: स्मृती मंधानाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू
माजी भारतीय निवडकर्ता म्हणाले, “तेथून तो त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट होता आणि त्यानंतर त्याचे नाव चर्चेत राहिले. त्यावेळी मी कोलकात्यात होतो आणि सौरव गांगुली कर्णधार होता, हेही मला आठवतं. मला त्याला भेटायचे होते आणि त्याला सांगायचे होते की एक कीपर आहे, ज्याने भारतीय संघात यावे. कारण तो चमकदार फलंदाजी करत होता आणि सुरक्षित कीपर होता. दुर्दैवाने, पाकिस्तान दौऱ्यापूर्वी सौरवने एमएस खेळताना पाहिले नाही आणि त्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही.”