ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत भारतीय क्रिकेट संघात दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी या कसोटीतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजने मेलबर्न कसोटीतून पदार्पण केले होते. त्यानंतर आज सुंदर आणि नटराजनला संधी मिळाली. यातील नटराजनचे कसोटी पदार्पण हे खास ठरले. कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरताच त्याने इतिहास रचला.

आणखी वाचा- भारतीय कसोटी इतिहासात ७ वर्षात पहिल्यांदाज घडली ‘ही’ गोष्ट

वेगवान गोलंदाज नटराजनचे कसोटी पदार्पण ऐतिहासिक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे नटराजनला पदार्पणाची संधी मिळाली. याच दौऱ्यात एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका अशा दोन्ही मालिकेतदेखील नटराजनने दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संधी मिळवत पदार्पण केले होते. एकाच दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा नटराजन पहिला भारतीय खेळाडू ठरला. ICC स्वत: ट्विट करत या ऐतिहासिक कामगिरीबद्दलची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा- सिराजच्या चेंडूवर रोहित शर्मानं घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडीओ

रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीमुळे अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. अश्विनने सुंदरला टेस्ट कॅप दिली. तर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे नटराजनला संधी देण्यात आली. त्याला गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या हातून कसोटी कॅप मिळाली. नटराजन हा भारताकडून कसोटी पदार्पण करणारा ३००वा तर सुंदर ३०१वा खेळाडू ठरला.