टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहेत. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर नामिबियाविरुद्ध खेळताना बाबर आणि रिझवानने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. स्पर्धेत बाबर आझमने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली आहे. नामिबिया विरुद्ध खेळताना ३९ चेंडूत ५० धावा केल्या आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

कर्णधार विराट कोहलीने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. बाबर आझमने नामिबियाविरुद्ध खेळताना अर्धशतक झळकावलं आणि १४ वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबरने ४९ चेंडूत ७० धावा केल्या. या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. अजूनही भारताचे तीन सामने उरले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हे सामने खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीत वर्णी लागली नाही लागली, तर विराट कोहली या तीन सामन्यानंतर कर्णधार पदावरून पायउतार होणार आहे. या तीन सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली तर विक्रम पुन्हा एकदा त्याच्या नावावर होणार आहे.

बाबर आझमने २७ सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने ४४ सामन्यात १३ अर्धशतकं झळकावली आहेत. केन विलियमसन्सने ५० सामन्यात ११ तर , एरॉन फिंचने ५१ सामन्यात ११ अर्धशतकं झळकावली आहेत. तर इंग्लंडच्या इऑन मॉर्गननं ६० डावात ९ अर्धशतकं झळकावली आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

नामिबिया – स्टीफन बार्ड, क्रेग विल्यम्स, मायकेल व्हॅन लिंगेन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), जेन निकोल लॉफी-ईटन, जेन ग्रीन (यष्टीरक्षक), डेव्हिड वीज, जेजे स्मिट, जेन फ्रीलिंक, रुबेन ट्रम्पेलमन आणि बेन शिकोंगो.