टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ शर्थीचे प्रयत्न करत आहे. स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात धावगती राखण्यासाठी ७ षटकं आणि १ चेंडूत स्कॉटलंडने दिलेलं आव्हान पूर्ण करायचं होतं. स्कॉटलंडने विजयासाठी ८६ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं हे आव्हान ६ षटकं आणि ३ चेंडूत पूर्ण केलं. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आक्रमक खेळी केल्याने हे आव्हान गाठता आलं. या खेळीत केएल राहुलचं मोलाचं योगदान होतं. केएल राहुल वेगवान अर्धशतक झळकवल्याने भारताला स्कॉटलंडने दिलेलं आव्हान पूर्ण करता ठराविक षटकात पूर्ण करता आलं. केएल राहुलने संयमी खेळी बरोबरच चांगलीच फटकेबाजी केली.

केएल राहुलने १८ चेंडूत ५० धावा केल्या आणि १९ व्या चेंडूवर बाद झाला. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. यापूर्वी केएल आणि रोहित शर्माने अफगाणिस्तान विरुद्धही चांगली फलंदाजी केली होती. आता अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सामन्याकडे भारताचं लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

स्कॉटलंड – काइल कोएत्झर (कर्णधार), जॉर्ज मुन्सी, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॉट, सफयान शरीफ, अलास्डेअर इव्हान्स, ब्रॅडली व्हील.