T20 WC: महेंद्रसिंह धोनीकडे भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीकडे टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची भूमिका सोपवली आहे. त्यामुळे त्याचा अनुभव टीम इंडियाच्या कामी येणार आहे.

Mahendra_Singh_Dhoni_Mentor
T20 WC: महेंद्रसिंह धोनीकडे भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया (Photo- BCCI And AP)

यंदाच्या टी २० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. आयपीएलचा अनुभव गाठिशी असल्याने भारतीय संघाला युएईच्या भूमीवर चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. दरम्यान, बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीकडे टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची भूमिका सोपवली आहे. त्यामुळे त्याचा अनुभव टीम इंडियाच्या कामी येणार आहे. धोनीकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून सलमान बट्टने याबाबत आपली भूमिका मांडली आहे. युट्यूबर चॅनेलवर चर्चा करताना धोनीबद्दल त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.

“महेंद्रसिंह धोनी एक यशस्वी कर्णधार आणि खेळाडू राहिला आहे. तो भारतीय संघाला चांगलं मार्गदर्शन करू शकतो. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाने चांगलं क्रिकेट खेळलं आहे. मात्र अंतिम फेरीत आपली योजना योग्य पद्धतीने अवलंबताना दिसत नाही. धोनीकडे अंतिम सामना जिंकण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवणं सोपं होईल. त्यामुळेच त्याला मार्गदर्शकाची जबाबदारी दिली आहे.”, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून सलमान बट्टने आपल्या युट्यूब चॅनेलवरील चर्चेत सांगितलं.

महेंद्रसिंह धोनी भारतीय संघासोबत आता युएईत आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती ट्वीट करून दिली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये धोनी भारतीय संघासोबत असणार आहे. बीसीसीआयने दोन फोटो ट्वीट करत महेंद्रसिंह धोनी संघासोबत असल्याची माहिती दिली आहे. “महेंद्रसिंह धोनीचं स्वागत. धोनी नव्या भूमिकेसह टीम इंडियासोबत आहे”, अशी पोस्ट बीसीसीआयने लिहिली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी २० वर्ल्डकप आणि एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc pakistan first reaction after responsibility of guiding team india by dhoni rmt

ताज्या बातम्या