टी २० विश्वचषकासाठी एका महिन्याहून कमी कालावधी बाकी आहे. असं असतानाच मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांची सध्याच्या आयपीएलमधील कामगिरी पाहून निवड समितीच्या अधिकाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. हे तिघेही सध्या आयपीएलच्या उर्वरित पर्वामध्ये खेळत असून त्यांना नावाला साजेशी कामगिरी अद्याप करता आलेली नाही. निवड समितीचं टी २० विश्वचषकाच्या संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंच्या खेळावर बारीक लक्ष आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये या खेळाडूंची कामगिरी अशीच सुमार राहिल्यास या तिघांपैकी एका खेळाडूच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अय्यरला सध्या राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलंय. मुंबईने आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये सलग तीन सामने गमावले आहेत.

नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…

मुंबई इंडियन्सने मागील पर्वामध्ये जेतेपद पटकावले होते. त्यानंतरच या संघातील अनेक खेळाडूंना निवड समितीने संधी दिली. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि श्रीलंकन दौऱ्यामध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संघी मिळाली. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला भारतीय एकदिवसीय संघ आणि टी २० मध्ये संधी देण्यात आली. तर राहुल चाहरला एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. याच कामगिरीच्या जोरावर तिघांना टी २० विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलं. मात्र आता सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या उर्वरित पर्वामध्ये ते खेळाडू संघर्ष करताना आणि मैदानामध्ये मौक्याच्या क्षणी चाचपडताना दिसत असल्याने निवड समितीचं टेन्शन वाढलंय.
इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार ईशान किशनच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यासंदर्भात विचार सुरु असून या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेऊन आहे. सध्या हार्दिक पांड्याला संघामध्ये कायम ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे काय होईल हे कामगिरी ठरवेल…
बीसीसीआयच्या सुत्रांनी इनसाइडस्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार टी २० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची कामगिरी सध्या चिंतेचे विषय नक्कीच आहे. मात्र आयपीएलमध्ये अजून काही सामने बाकी असल्याने हे खेळाडू पुन्हा चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघातून खेळताना चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे त्याचा जास्त चिंता करण्याची गरज नाहीय. ईशान किशननेही श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामिगीर केली होती. रविवारी विराट कोहली सामन्यानंतर ईशानशी चर्चा करताना दिसला. त्यामुळे पुढे काय होईल हे येणार काळ आणि कामगिरीच ठरवेल, असं सुत्रांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2021 ishan kishan hardik pandya suryakumar yadav poor form bcci can be replace one by shreyas iyer scsg
First published on: 28-09-2021 at 13:05 IST