T20 World Cup 2021:आता थिएटरमध्ये बसून पाहा भारतीय संघाचे सामने!

नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह ३५ हून अधिक शहरांमधील ७५ हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सामने प्रदर्शित केले जातील.

T 20 world cup
आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ (प्रातिनिधिक फोटो)

आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ओमान आणि यूएईच्या भूमीवर आयोजित केला जात आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी आहे, परंतु भारतीय संघाच्या जवळपास सर्व सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भारतात राहून स्टेडियमवर सामना बघताना एन्जॉय करायचे असेल तर ते आता शक्य होणार आहे, कारण आता थिएटरमध्ये बसून तुम्ही मोठ्या पडद्यावर मॅचचा आनंद घेऊ शकता. मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमांनी भारतीय चाहत्यांना ही मोठी बातमी दिली आहे.

खरं तर, शुक्रवारी, पीव्हीआर सिनेमांनी पुष्टी केली की त्याला आयसीसी पुरुषांच्या टी २० विश्वचषक २०२१ च्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रदर्शन करण्याचे अधिकार मिळाले आहेत. टी २० विश्वचषक २०२१ ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. पीव्हीआरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्याने आयसीसी पुरुषांच्या टी -२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह भारतीय सामन्यांच्या थेट प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) करार केला आहे.

मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमांनी सांगितले की, नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह ३५ हून अधिक शहरांमधील ७५ हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सामने प्रदर्शित केले जातील. पीव्हीआर लिमिटेडचे ​​सीईओ गौतम दत्ता म्हणाले की, आयसीसीशी जोडल्या गेल्यामुळे त्यांना अत्यंत आनंद होत आहे, कारण त्यांना विश्वास आहे की देशात क्रिकेट आणि चित्रपट एकमेकांना पूरक आहेत.ते म्हणतात, “मोठ्या पडद्यामुळे आयसीसी पुरुषांच्या टी -२० विश्वचषकाचे कव्हरेज वाढवण्याची एक अनोखी संधी मिळते. क्रिकेट आणि चित्रपट एकमेकांना पूरक आहेत.”

भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी आपल्या टी -२० विश्वचषक २०२१ मोहिमेला सुरुवात करेल, ज्यामध्ये भारतीय संघ त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानशी लढेल आणि हा सामना ब्लॉकबस्टर सामन्यापेक्षा कमी नसेल. टीआरपी आणि दर्शकांसाठी हा एक वेगळा सामना आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 now sit in the theater and watch the matches of the indian team ttg

ताज्या बातम्या