अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ जून ते २९ जून या कालावधीत टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आपल्या गटातील पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये आणि चौथा फ्लोरिडामध्ये खेळणार आहे. भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक कसे असेल आणि संघाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार आहेत, जाणून घ्या.

टी-२० विश्वचषक हा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार सामने किती वाजता खेळवले जाणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. तर भारताचे सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवले जाणार आहेत. सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी होणार आहे. याआधी ऑक्टोबर २०२२ मध्ये मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये टी-२० विश्वचषकात दोन्ही संघांचा शेवटचा सामना झाला होता.

भारतीय संघाचे टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यांचे वेळापत्रक


भारत वि आयर्लंड – ५ जून – न्यूयॉर्क – रात्री ८ वाजता
भारत वि पाकिस्तान – ९ जून – न्यूयॉर्क – रात्री ८ वाजता
भारत वि युएसए – १२ जून – न्यूयॉर्क – रात्री ८ वाजता
भारत वि कॅनडा – १५ जून – लॉडरहिल – रात्री ८ वाजता

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोस येथे खेळवला जाईल, तर उपांत्य फेरीचे सामने २६ आणि १७ जून रोजी खेळवले जातील. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजमधील सहा आणि अमेरिकेतील तीन ठिकाणी एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० संघांची चार गटात विभागणी
अ गट: भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट: न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ