टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर आज भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धुसर झाली आहे.
न्यूझीलंडचा डाव
भारताच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी आक्रमक सुरुवात केली. झटपट २० धावा बनवल्यानंतर गप्टिलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. गप्टिल तंबूत परतल्यानंतर मिशेलने मोर्चा सांभाळला. कप्तान केन विल्यमसनने मिशेलला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू दिला. या दोघांनी एकेरी, दुहेरी आणि मोक्याच्या क्षणी चौकार-षटकार ठोकत भारतावर दबाव वाढवला. न्यूझीलंड विजयाकडे सहज वाटचाल करत असताना मिशेल बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. त्यानंतर विल्यमसनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत १५व्या षटकात न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला.
भारताचा डाव
नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून टीम इंडियाने इशान किशन आणि केएल राहुल ही जोडी आजमावून पाहिली. पण न्यूझीलंडने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (४) तर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला २ बाद ३५ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कप्तान विराट कोहलीकडून आधाराची अपेक्षा होती, पण फिरकीरपटू ईश सोधीने दोघांना जाळ्यात अडकले. त्यानंतर ऋषभ पंतही (१२) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही १९व्या षटकात माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ११ धावा कुटल्यामुळे भारताा शंभरीपार पोहोचता आले. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. रवींद्र जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.
विल्यमसनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत १५व्या षटकात न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह न्यूझीलंडने आपले गुणांचे खाते उघडले. तर पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धुसर झाली आहे.
१३व्या षटकात सलामीवीर मिशेलचे अर्धशतक हुकले. बुमराहने त्याला झेलबाद केले. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या.
१२ षटकात न्यूझीलंडने १ बाद ९४ धावा केल्या.
१०व्या षटकात मिशेलने शार्दुल ठाकूरला १४ धावा चोपल्या. १० षटकात न्यूझीलंडने १ बाद ८३ धावा केल्या.
सातव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक फलकावर लावले. ८ षटकात न्यूझीलंडने १ बाद ६४ धावा केल्या.
पॉवरप्लेचे शेवटचे षटक रवींद्र जडेजाने टाकले. या षटकात मिशेलने एक षटकार आणि दोन चौकार खेचले. ६ षटकात न्यूझीलंडने १ बाद ४४ धावा केल्या.
५ षटकात न्यूझीलंडने १ बाद ३० धावा केल्या.
चौथ्या षटकात जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने गप्टिलला (२०) धावांवर शार्दुलकरवी झेलबाद केले. गप्टिलनंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला आहे. ४ षटकात १ बाद २८ धावा केल्या.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने तिसरे षटक टाकले. या षटकात गप्टिलने २ चौकार ठोकले. ३ षटकात न्यूझीलंडने बिनबाद १८ धावा केल्या.
मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी सलामी दिली. २ षटकात न्यूझीलंडने बिनबाद ६ धावा केल्या.
डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. रवींद्र जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.
१९व्या षटकात भारताने हार्दिक पंड्यालाही गमावले. बोल्टने त्याला गप्टिलकरवी झेलबाद केले. हार्दिकनंतर शार्दुल ठाकूर मैदानात आला आहे. हार्दिकने २३ धावा केल्या. याच षटकात बोल्टने शार्दुलाही तंबूत धाडले. १९ षटकात भारताने ७ बाद ९९ धावा केल्या.
१८ षटकात भारताने ५ बाद ९४ धावा केल्या.
१७ षटकात भारताने ५ बाद ८६ धावा केल्या.
१६ षटकात भारताने ५ बाद ७८ धावा केल्या.
१५व्या षटकात मिल्नेने पंतचा त्रिफळा उद्ध्वस्त करत भारताला पाचवा धक्का दिला. पंतने १२ धावा केल्या. पंतनंतर रवींद्र जडेजा मैदानात आला आहे. १५ षटकात भारताने ५ बाद ७३ धावा केल्या.
१४ षटकात भारताने ४ बाद ६७ धावा केल्या.
१३ षटकात भारताने ४ बाद ६२ धावा केल्या.
१२ षटकात भारताने ४ बाद ५८ धावा केल्या.
सुरुवातीच्या पडझडीनंतर विराटकडून आधार मिळेल असे सर्वांना वाटत होते, पण न्यूझीलंडने टीम इंडियाला अजून एक दणका दिला. ११व्या षटकात सोधीने विराटला झेलबाद केले. विराटला ९ धावा करता आल्या. विराटनंतर हार्दिक पंड्या मैदानात आला आहे. ११ षटकात भारताने ४ बाद ५२ धावा केल्या.
१० षटकात भारताने ३ बाद ४८ धावा केल्या.
नऊ षटकात भारताने ३ बाद ४३ धावा केल्या.
न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोधीने आठवे षटक टाकले. त्याने रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितने १४ धावा केल्या. रोहितनंतर ऋषभ पंत मैदानात आला आहे. ८ षटकात भारताने ३ बाद ४१ धावा केल्या.
सात षटकात भारताने २ बाद ३७ धावा केल्या.
पॉवरप्लेमध्ये भारताने २ बाद ३५ धावा केल्या.
पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. राहुलनंतर विराट मैदानात आला आहे.
पाच षटकात भारताने १ बाद २९ धावा केल्या. या षटकात रोहितने मिल्नला एक चौकार आणि एक अप्रतिम षटकार ठोकला.
चौथ्या षटकात भारताने १ बाद १४ धावा केल्या.
इशाननंतर रोहित फलंदाजीला आला. पहिल्याच चेंडूवर रोहितला जीवदान मिळाले. बोल्टच्या गोलंदाजीवर मिल्नेने रोहितचा सोपा झेल सोडला. ३ षटकात भारताने १ बाद १२ धावा केल्या.
तिसऱ्या षटकात इशानने भारतासाठी दुसरा चौकार ठोकला. पण ट्रेंट बोल्टने याच षटकात त्याला झेलबाद केले. इशानने ४ धावा केल्या.