टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ मधील अ गटातील न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना बुधवारी रद्द करण्यात आला. मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दोन्ही संघांमध्ये १-१ गुणांची विभागणी झाली. यापूर्वी या मैदानावर इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला होता. डकवर्थ लुईस नियमापुढे इंग्लंडचा ५ धावांनी पराभव झाला. यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी ब गटातील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यामधील सामना पावसामुळे रद्द केला होता. त्यामुळे त्या दोन्ही संघांना १-१ गुणांवर समाधान मानावे लागले.

न्यूझीलंड संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात किवी संघाने ८९ धावांनी विजय मिळवला. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात संघाचा ५ गडी राखून पराभव झाला. पावसाने सामना रद्द झाल्याने अफगाणिस्तानला त्याचा फायदा झाला आणि काहीही न करता एक गुण मिळाला.

गट-अ समीकरण

अ गटातील गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंड २ सामन्यांपैकी १ सामना जिंकून ३ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर २ सामन्यांपैकी १ सामना जिंकून श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच इंग्लंड ही २ पैकी १ सामना जिंकून तिसऱ्या आणि आयर्लंड १ सामन्यात १ विजयांसह चौथ्या स्थानावर असून गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलिया २ पैकी १ जिंकून पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान २ सामन्यांपैकी १ सामना गमावल्यानंतर १ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

हेही वाचा :   T20 World Cup: ‘पावसाने जरी आयर्लंडची…’ इंग्लंडच्या पराभवावर वीरेंद सेहवागसह जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू झाले व्यक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रुप ऑफ डेथ गट-अ झाला

गट-अ हा मृत्यू गट बनला आहे. गेल्या शनिवारी सिडनी येथे झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ८९ धावांनी पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या निव्वळ धावगतीने बाजी मारली. यानंतर मंगळवारी मार्क्स स्टॉइनिसच्या ८१ चेंडूत ५९ धावांच्या जोरावर संघाने २१ चेंडू राखून श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. यामुळे रन रेट सुधारला, परंतु तो अजूनही नकारात्मक आहे. आयर्लंडचा नेट रन रेटही नकारात्मक आहे. याशिवाय न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंडचा धावगती सकारात्मक आहे. श्रीलंकेचा धावगती इंग्लंडपेक्षा चांगला आहे.