बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने सराव सामना जिंकून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शानदार सुरुवात केली. सोमवारी पाकिस्तानने सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. कॅरेबियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाबर आझमने आपल्याच सहकाऱ्याला मैदानात ट्रोल केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विंडीजचा फलंदाज लेंडल सिमन्सने शाहीन आफ्रिदीच्या षटकाच्या चोरटी धाव घेतली. ही धाव घेताना पाकिस्तानचा खेळा़डू शादाब खानने क्षेत्ररक्षण केले. य़ावेळी बाबरने ”शादाब तू म्हातारा झाला आहेस”, असे म्हणत त्याच्या क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवली. शादाबचे वय फक्त २३ वर्षे आहे. या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा – T20 WC: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटला आलंय ‘टेन्शन’; भारताचेच खेळाडू ठरतायत कारणीभूत!

या सामन्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून बाबरने उत्तम कामगिरी केली. मोहम्मद रिझवानसह सलामी देत ​​उजव्या त्याने ४१ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याला १२व्या षटकात हेडन वॉल्श जूनियरने बाद केले, पण तोपर्यंत पाकिस्तानने सामना खिशात टाकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा दुसरा सराव सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. बाबर आझमचा संघ रविवारी २४ ऑक्टोबर रोजी दुबईत भारताचा सामना करेल.