T20I Tri Series Final: वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरु असून त्यात या महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी तिथे पोहचल्या आहेत. मात्र त्याआधी टीम इंडियाने सराव व्हावा या दृष्टीकोनातून तिरंगी मालिकेत खेळत आहे. त्यात भारतीय महिला संघाने शानदार प्रदर्शन करत तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली असून आज संध्याकाळी ६.३० वाजता यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात होणार आहे. या मालिकेत भारत, दक्षिण आफ्रिका  या दोन संघांव्यतिरिक्त वेस्ट इंडीजचा संघ देखील सामील होता.

महिला भारतीय संघ टी२० विश्वचषकापूर्वी ही तिरंगी मालिका जिंकू इच्छितो. हरमनब्रिगेड यासाठी सज्ज झाली असून १० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाची पूर्वतयारी (प्रिलिम) याकडे पहिले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत भारताचा १-४ असा पराभव झाला होता. परंतु संघाने या तिरंगी मालिकेत पुनरागमन केले आणि तीन विजयांची नोंद केली आणि १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या १० संघांच्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आता ट्रॉफी जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करू इच्छित आहे.

भारताने तिरंगी मालिकेतील सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता पण त्यानंतर साखळी फेरीत दोन्ही संघांमधील सामना पावसाने रद्द केला. भारताने वेस्ट इंडिजला दोनदा पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र विश्वचषकात भारतासमोर मुख्य आव्हान असेल ते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करण्याचे.

हेही वाचा: Women’s T20 World Cup: वरिष्ठ संघाला विश्वचषक जिंकून देणारच! अंडर १९ विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर शफाली-ऋचाने दिला आत्मविश्वास

तीन सामन्यांत आठ विकेट घेणारी अष्टपैलू दीप्ती शर्मा अंतिम फेरीत भारतासाठी महत्त्वाची गोलंदाज असेल. त्याचवेळी टीकेच्या भोवऱ्यात अडकलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात आवश्यक धावा केल्या आणि हे सातत्य तिला कायम राखायचे आहे. दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या पूजा वस्त्राकरचे पुनरागमन हे भारतासाठी सर्वात मोठे सकारात्मक ठरेल. भारताच्या अंडर-१९ महिला संघाने पॉचेफस्ट्रूममध्ये पहिल्या अंडर-१९ विश्वचषकात विजय मिळवल्याने हरमनप्रीतच्या संघाला आयसीसी विजेतेपदासह अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकेल.

हवामान आणि खेळपट्टी

महिला क्रिकेटमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी२० तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील फायनल सामना आज (२ फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसहाला बफेलो पार्क इस्ट लंडन येथे सुरुवात होणार आहे. बफेलो पार्कची खेळपट्टी ही नेहमी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी ठरली आहे. त्यामुळे जो कोणता संघ आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकेल तो आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. हवामान आजच्या सामन्यात कोरडे राहणार आहे.

हेही वाचा: Hardik Pandya: ‘धोनी नंतर आता मीच!’ हार्दिकने स्वतःला कायमस्वरूपी कर्णधार म्हणून केले घोषित? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), अंजली सरवानी, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, अमनजोत कौर, एस मेघना, मेघना सिंग, शिखा पांडे, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्स, शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकार, सुषमा वर्मा आणि राधा यादव.

दक्षिण आफ्रिका: सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन (उपकर्णधार), अनेके बॉश, टॅझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, अॅनेरी डर्कसेन, लारा गुडॉल, शबनीम इस्माईल, शिनालो जाफ्ता, मारिजाने कॅप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, टेबोगो माके , नॉनकुलुलेको मलाबा, तुमी शेखुखुने, डेल्मी टकर, लॉरा वोल्वार्ड.