scorecardresearch

Hardik Pandya: ‘धोनी नंतर आता मीच!’ हार्दिकने स्वतःला कायमस्वरूपी कर्णधार म्हणून केले घोषित? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा

Hardik Pandya News: भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने स्वत: ची तुलना एमएस धोनीशी करत मोठे विधान केले आहे. त्याला टीम इंडियाचा नवा एमएस धोनी बनायचा आहे.

Since Dhoni left the responsibility has come on me Hardik Pandya has considered himself as the permanent captain
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Hardik Pandya News: न्यूझीलंड टी२० मालिकेत टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने म्हटले आहे की, त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी च्या भूमिकेचे अनुकरण करण्याची सवय लागली आहे. हार्दिकने म्हटले आहे की, सध्या तो खेळ शेवटपर्यंत नेण्याचे आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्याचे आव्हान स्वीकारत आहे. हार्दिक पांड्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की त्याने स्वतःला कायम कर्णधार मानले आहे आणि संघ व्यवस्थापन रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या (टी२० क्रिकेटमध्ये) पुढे गेले आहे.

भारतीय संघाने तिसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा विक्रमी १६८ धावांनी पराभव केला. यासह त्याने मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत शानदार कामगिरी केली. शतकवीर शुबमन गिलला सामनावीर आणि हार्दिकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने स्वतःची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी केली.

मला भारतीय संघाचा धोनी व्हायचं आहे

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक म्हणाला, “माही भारतीय संघासाठी जी भूमिका करत असे, ती भूमिका साकारण्यास माझी काहीच हरकत नाही. त्यावेळी मी संघात नवीन होतो आणि मैदानात सर्वत्र फटके मारायचो. पण, धोनीभाई गेल्यापासून अचानक ती जबाबदारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेण्यात मला त्यात कुठलीच अडचण नाही. आम्हाला योग्य निकाल मिळाले पाहिजेत त्यात मला जरा हळू खेळावे लागले तर तरी चालेल.”

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, “मला नेहमीच षटकार मारण्यात मजा येते. पण हा आक्रमक खेळ आता मला सर्वच ठिकाणी नाही खेळून चालणार कारण प्रत्येक वेळी सामन्यातील परिस्थिती वेगळी असते. खेळपट्टी, मैदानाची लांबी, विरोधी संघ आणि धावफलक त्यातही धावसंख्या उभारताना किंवा त्याचा पाठलाग करताना कसे खेळायचे यावर मी विचार करत आहे. मी भागीदारीवर विश्वास ठेवतो आणि माझ्या फलंदाजी भागीदाराला आणि मी तिथे असलेल्या संघाला काही आश्वासन आणि शांतता देऊ इच्छितो. यातील बहुतांश सामने मी खेळले आहेत. मी दबाव कसे हाताळायचे आणि गिळायचे हे शिकले आहे आणि सर्वकाही शांतपणे घडते याची खात्री केली आहे.

हेही वाचा: IND vs NZ: “तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा…”, हार्दिकच्या मुलाखतीत शतकवीर शुबमन गिलचा खुलासा; Video व्हायरल

स्ट्राइक रेट कमी ठेवावा लागेल – हार्दिक

हार्दिक पुढे म्हणाला, “अशा प्रकारे मला माझा स्ट्राइक रेट कमी करावा लागेल. माही भाई (धोनी) कुठेतरी जी भूमिका करत असे, ती भूमिका मला करायला हरकत नाही. हार्दिकने ८७ टी२० मध्ये १४२च्या स्ट्राईक रेटने १२७१ धावा केल्या आहेत. तो पुढे म्हणाला, “मला वाटतं, त्यावेळी मी लहान होतो, आणि मी पार्कच्या आसपास तो मारत होतो, पण आता अचानक जबाबदारी आली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:50 IST
ताज्या बातम्या