Taijul islam World Record : बांगलादेश विरुद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत नवनवीन विक्रम होताना दिसत आहेत. या सामन्यात आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात आली आहे. हा विक्रम बांगलादेशचा स्पिनर तैजुल इस्लामच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयर्लंडचा खेळाडू पीटर मूरला बाद करत तेजुलने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
आयर्लंडचा खेळाडू पीटर मूर कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या संघांसाठी खेळला आहे. दोन वेगवेगळ्या देशांसाठी खेळणाऱ्या एका फलंदाजाची कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम तैजुलने केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तैजूल हा पहिला खेळाडू बनला आहे.हरारेमध्ये जन्मलेल्या पीटर मूर आयर्लंडच्याआधी झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. वर्ष २०१८ मध्ये जेव्हा जिम्बाब्वेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला होता. तेव्हा पीटर मूर त्या टीमचा खेळाडू होता.
पीटरला तैजुल इस्लामने डक आऊट करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. बांगलादेश विरुद्ध आयर्लंडच्या सामन्याचा तिसऱ्या दिवशी आयर्लंडने ८ विकेट्स गमावत २८६ धावा केल्यादुसऱ्या इनिंगमध्ये १३१ धावांची लीड मिळाली होती.पीटर मूरला पहिल्या इनिंगमध्ये तैजुस इस्लामने बाद केलं होत. मूर फक्त एक धाव करून तंबूत परतला होता. तैजुलने सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली.