टाटा खुली टेनिस स्पर्धा : शशी मुकुंदचे आव्हान संपुष्टात

रामकुमार रामनाथन आणि पूरव राजा यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

(संग्रहित छायाचित्र)

आता आशा प्रज्ञेशवर: रामनाथन-पूरव दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

युवा टेनिसपटू शशी मुकुंद याने दुसऱ्या सेटमध्ये कडवा संघर्ष केला तरी त्याला टारो डॅनियल याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. टाटा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे आता प्रज्ञेश गुणेश्वरनवरच भारताच्या आशा आहेत.

रामकुमार रामनाथन आणि पूरव राजा यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रज्ञेशची गुरुवारी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या क्वान सून वूशी लढत आहे.

विशेष प्रवेशिकेसह खेळणाऱ्या शशी मुकुंदला डॅनियलकडून २-६, ६-७ अशी हार पत्करावी लागली.

पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथन आणि पुरव राजा यांनी चुरशीच्या लढतीत भारताचा सुमित नागल आणि त्याचा बेलारूसचा सहकारी इगोर गेरासिमोव्ह या जोडीला ७-६, ६-३ असे नमवले. रामकुमार आणि पूरव जोडीची उपांत्यपूर्व फेरीत भारताचा लिएंडर पेस आणि ऑस्ट्रेलियाचा सहकारी मॅथ्यू एब्डेनशी गाठ पडेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tata open tennis tournament shashi mukunds challenge ends abn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या