महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव लावली सुरु आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेला लिलाव स्मृती मानधना या नावाने सुरू करण्यात आला आहे. स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर स्मृती मंधानासह दक्षिण आफ्रिकेत असलेल्या भारतीय संघाने एकच जल्लोष केला. या घटनेचा व्हिडिओ आरसीबीने शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाच्या नावावर लागली, तिची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. स्मृतीसाठी जवळपास सर्व संघांनी बोली लावली आणि रॉयल चॅलेंजर्स आरसीबीने तिला ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले. टीम इंडियाचे खेळाडू एकत्र बसून लिलाव पाहत आहेत. फ्रँचायझी मंधानासाठी बोली लावत असताना, संघातील बाकीचे खेळाडू स्मृतीचं अभिनंदन करत आनंद साजरा करत होते.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी होत आहेत. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनौ, दिल्ली आणि बेंगळुरू येथील संघांचा समावेश आहे. लिलावात ४०९ खेळाडूंवर बोली लावली जाणार असून, २०० हून अधिक खेळाडू भारतीय आहेत. तर बाहेरच्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक खेळाडू आहेत.

महिला प्रीमियर लीग लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी –

स्मृती मंधाना (भारत) – आरसीबीला ३.४० कोटी रुपये
अॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया) – गुजरात जायंट्सला ३.२० कोटी रुपये
हरमनप्रीत कौर (भारत) – मुंबई इंडियन्सला १.८० कोटी रुपये
एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – आरसीबीला १.८० कोटी रुपये
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – यूपी वॉरियर्सला १.८० कोटी रुपये
सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) – आरसीबीला ५० लाख रुपये

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india celebrates as smriti mandhana wins highest bid in womens ipl auction watch video vbm
First published on: 13-02-2023 at 16:41 IST