IPL 2023: आयसीसी विश्वचषकाच्या सेमी फायनलमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियावर अनेकांनी टीका केली होती. भारतीय संघातील माजी खेळाडूंनीसुद्धा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला धारेवर धरले होते. टीम तणावात आहे, स्ट्रेस नीट हाताळता येत नाही अशी कारणे पळवाटा वाटतात, इतकंच असेल तर आयपीएलच्या वेळी का कारणं देत नाही अशा शब्दात अनेकांनी सुनावले होते. या टीकाकारांमध्ये टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ते अगदी पाकिस्तानच्या खेळाडूंचा सुद्धा समावेश होता. आता याच यादीत रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकाचा सुद्धा समावेश झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पोर्ट्सकीडाशी संवाद साधताना प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्मासह भारतीय संघाला कठोर भाषेत सल्ला दिला भारतीय संघाने वर्कलोडचं कारण देऊन आंतरराष्ट्रीय सामने गमावणे थांबवले पाहिजे. तुमचा वर्कलोड कमी करण्यासाठी आयपीएलचा वापर केला जाऊ शकतो.अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली सारखे भारतीय संघातील मुख्य खेळाडू विश्रांती घेतात यामुळे संघ अस्थिर दिसून येतो. सध्या टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे यावेळी बीसीसीआयने विराट, रोहित, के. एल. राहूल या खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला सुद्धा ब्रेक दिला आहे.

“मागील सात-आठ महिन्यांपासून आपण एक अस्थिर संघ ठरत आहोत, आणि अशावेळी विश्वचषकाची तयारी पूर्ण होणे शक्यच नाही. वर्ल्डकपसाठी प्रस्थापित संघाची गरज असते. सात महिन्यांपासून संघात विचार न करता निर्णय घेतले जात आहेत, कोणीही सलामीवीर म्हणून मैदानात येतं, कोणालाही गोलंदाजी दिली जाते”

“जगातील प्रत्येक खेळाडू तुमच्याइतकेच सामने खेळत आहे कारण ते त्यांचं काम आहे. जर तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल आणि वर्कलोड भासत असेल तर हा ताण कमी करण्यासाठी आयपीएल खेळू नका. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक खेळ खेळला पाहिजे कारण त्यातून स्वतःला व देशपला काहीतरी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणतीही तडजोड करता काम नये.”

लाड म्हणतात की, “आयपीएल खेळूच नका हे मी म्हणू शकत नाही पण जर तुम्हाला मुख्य स्पर्धांमध्ये खेळायला जमत नसेल तर खेळाडूंनी स्वतः विचार करायला हवा. तुम्ही जेव्हा देशासाठी उत्तम खेळता तेव्हाच तुमचा आयपीएलसाठी विचार केला जातो, त्यानुसार तुमचं मानधन ठरतं, कुणालाही लगेच थेट आयपीएलमध्ये घेतलं जात नाही.”

दरम्यान, भारताला शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकून तब्बल ९ वर्ष झाली आहेत. यंदाच्या विश्वचषकात भारताकडून जगभरातील क्रिकेट प्रेमींना अपेक्षा होत्या. संपूर्ण विश्वचषकात रोहित शर्माचा संघ चढउतार करूनही उत्तम खेळला होता. एक अपवाद वगळल्यास भारताने सर्व सामने जिंकले होते मात्र इंग्लंडसमोर टीम इंडिया अगदीच दुबळी ठरली व मोक्याच्या वेळी संघ विश्वचषकातून बाहेर पडला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india defeat coach suggests rohit sharma virat kohli not to play ipl 2023 for work load management svs
First published on: 25-11-2022 at 15:15 IST