Team India Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक गमावलं आहे. या मालिकेत नाणेफेक गमावण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्याने सुरुवातीच्या चारही सामन्यात नाणेफेक गमावलं आहे.
गिलला कर्णधार म्हणून एकदाही नाणेफेक जिंकता आलेलं नाही. तर दुसरीकडे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १५ वेळेस नाणेफेक गमावलं आहे. याआधी सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या नावे होता. वेस्ट इंडिजने १२ वेळेस नाणेफेक गमावलं होतं. लॉर्ड्सच्या मैदानावर नाणेफेक गमावताच भारतीय संघाने हा विक्रम मोडून काढला होता.
भारतीय संघाने गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण नाणेफेकीच्या वेळी भारतीय संघाला नशिबाची साथ मिळालेली नाही. भारताने शेवटच्या वेळी नाणेफेक इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेच्या वेळी जिंकले होते. हा सामना जानेवारी महिन्यात पार पडला होता. म्हणजे शेवटच्या वेळी नाणेफेक जिंकून ६ महिने उलटले आहेत. पण भारताला एकदाही नाणेफेक जिंकता आलेलं नाही. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी -२० मालिका, वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण भारताला एकदाही नाणेफेक जिंकता आलं नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. आता शुबमन गिल कर्णधार आहे. पण भारतीय संघाचं नशीब काही बदललेलं नाही. गिलने सलग ५ वेळा नाणेफेक गमावलं आहे. पाचव्या कसोटीत ओली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी असा आहे दोन्ही संघांचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ:
भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज</p>
इंग्लंड संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग