India vs England 5th Test Match Highlights: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघाने जे करून दाखवल आहे, ते भलाभल्या दिग्गजांना जमलं नव्हतं. ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये पूर्ण जोर लावला आणि इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. हा सामना भारतीय संघाने ६ धावांनी जिंकून मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे दोघेही भारतीय संघाच्या ओव्हल विजयाचे हिरो ठरले आहेत.

जो रूट आणि हॅरी ब्रुक यांच्या शतकांमुळे भारतीय संघाच्या हातून हा सामना पूर्णपणे निसटला होता. पण मोहम्मद सिराजने भारतीय संघाला विश्वास दिला की, आपण हा सामना अजूनही जिंकू शकतो. सिराजला प्रसिध कृष्णाची चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून इंग्लंडच्या फलंदाजांंची डोकेदुखी वाढवली. ब्रुक आणि रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज धावा करताना संघर्ष करताना दिसून आले. शेवटी एटकिंसन उभा राहिला. पण सिराजने त्याला बाद करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने दिलं ३७४ धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २४७ धावा करता आल्या होता. यासह इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. केएल राहुल अवघ्या ७ धावा करत माघारी परतला होता. तर साई सुदर्शनला अवघ्या ११ धावा करता आल्या. भारतीय संघाला सुरूवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने आकाशदीपने ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याने यशस्वी जैस्वालसोबत मिळून शतकी भागीदारी केली. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने १११ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिलने ११, करूण नायरने १७ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने ५३, ध्रुव जुरेलने ३४, वॉशिंग्टन सुंदरने ५३ धावांची खेळी करत संघाचा डाव ३९६ धावांपर्यंत पोहोचवला.

इंग्लंडचा डाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला बेन डकेट आणि जॅक क्रॉउले यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. क्रॉउलेने १४ धावा केल्या, तर बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. कर्णधार ओली पोपने २७ धावांची खेळी केली. जो रूट पुन्हा एकदा इंग्लंडसाठी खंबीरपणे उभा राहिला. त्याने १०५ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने १११ धावांची खेळी केली.