scorecardresearch

Premium

VIDEO: सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची घोषणा करताच खेळाडूंनी जडेजाला सोडून प्रशिक्षकालाच मारली मिठी, जाणून घ्या कारण

Cricket World Cup 2023, IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान शानदार झेल घेतल्यानंतर जडेजाने ड्रेसिंग रूमच्या दिशेने पाहून खास मागणी केली होती. सामना संपल्यानंतर त्यांनी केलेली मागणी पूर्ण झाली.

Cricket World Cup 2023, IND vs BAN Match Updates
टीम इंडिया (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ravidra Jadeja won the best fielder Medal: टीम इंडियाने विश्वचषक २०२३ मधील पहिल्या चार सामन्यात विजयी चौकार लगानवला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपाठोपाठ भारताने गुरुवारी बांगलादेशचा पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियान ७ गडी राखून विजय नोंदवला. टीम इंडियाच्या खेळांडूचे सामना जिंकण्यासोबतच ड्रेसिंग रूममधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला देण्यात येणाऱ्या पदकावर लक्ष असते. रवींद्र जडेजाला गुरुवारी त्याच्या शानदार झेलसाठी हे पदक देण्यात आले, पण त्याची घोषणा खूप खास होती. याबाबतचा बीसीसीआयने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

रवींद्र जडेजाने क्षेत्ररक्षण करताना त्याने एक असा झेल घेतला, ज्याने सामन्याची दिशाच बदलून टाकली. यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. झेल घेतल्यानंतर जडेजा ड्रेसिंग रुमकडे पाहून पदकाची मागणी करताना दिसला होता. यानंतर सामना संपल्यानंतर त्याचे स्वप्न पूर्ण झाले. बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू एकत्र दिसत आहेत.सहसा संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप हे ड्रेसिंग रूमच्या टीव्हीवर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या नावाची घोषणा करत असतात. मात्र गुरुवारी त्यांनी खेळाडूंना असे सरप्राईज दिले की ते पाहून सर्वांनी आनंदाने उड्या मारल्या. जडेजा वगळता सर्वांनी कोचवर धूम ठोकली.

Test Ben Stokes fumed at Zack Crowley's dismissal
IND vs ENG 3rd Test : झॅक क्रॉऊलीला आऊट दिल्याने बेन स्टोक्स संतापला, क्रिकेटमधून ‘हा’ नियम हटवण्याची केली मागणी
IND vs ENG 3rd Test Match Updates Yashasvi Jaiswal Retired Hurt
IND vs ENG : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे ३२२ धावांची आघाडी, ‘यशस्वी’ खेळीनंतर जैस्वाल रिटायर्ड हर्ट!
MS Dhoni jersey number
“त्या दिवशी आई-वडिलांनी…”, धोनीने सांगितलं ७ नंबरची जर्सी का निवडली? चाहत्यांकडून ‘Thala for a reason’चा ट्रेंड
The team selection for the remaining matches india against England test match continues
श्रेयसच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर; इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी संघनिवडीची प्रतीक्षा कायम

प्रशिक्षक दिलीप यांच्या सरप्राईजने सर्व खेळाडू झाले चकीत –

प्रशिक्षक टी दिलीप यांनी सांगितले की, ते पदक जडेजाला द्यायचे की केएल राहुलला? याचा त्यांना प्रश्न पडला होता. यानंतर ते म्हणाले की पदक कोणाला मिळाले हे तुम्हीच बघा. सर्वांच्या नजरा ड्रेसिंग रुममधील टीव्हीवर होत्या, पण दिलीप यांनी खेळाडूंना मैदानावरील स्क्रीनकडे बघायला सांगितले. जडेजाचा फोटो स्क्रीनवर येताच खेळाडूं चकीत झाले. यानंतर सर्वांनी प्रशिक्षक दिलीप यांना घट्ट मिठी मारली. त्यानंतर संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये टाळ्यांचा आणि जल्लोषाचा आवाज झाला.

हेही वाचा – Hardik Pandya: टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिकच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट, जाणून घ्या किती सामन्याला मुकणार?

रवींद्र जडेजाने दिलीपला यांना दिले पदक –

यानंतर केएल राहुलने रवींद्र जडेजाला पदक प्रदान केले. जडेजाने आपल्या गळ्यातील पदक काढून प्रशिक्षक दिलीपच्या गळ्यात घातले. सामन्यादरम्यान जडेजाने जेव्हा कॅच घेतला, तेव्हा त्याने दिलीप यांच्याकडे पाहून त्याला पदक घालण्याचा इशारा केला होता. त्याची इच्छाही पूर्ण झाली. जडेजाची गणना संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. कॅच असो किंवा डायरेक्ट थ्रो, चेंडू जडेजाभोवती असेल तर फलंदाजाला कोणतीही रिस्क घ्यायची नसते.

हेही वाचा – IND vs BAN, World Cup 2023: विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाची का मागितली माफी? जाणून घ्या कारण

दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने या सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्याने जडेजाचेही कौतुक केले. यानंतर संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी जडेजाच्या फिटनेसचे तसेच संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले. फिटनेसच्या दृष्टीने आजचा सामना उत्तम उदाहरण असल्याचे त्याने सांगितले. प्रशिक्षक म्हणाले की केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने सामन्याची दिशा बदलणारे झेल घेतले. मात्र, हे पदक जडेजाला देण्यात आले. त्यांनी कुलदीप यादवचेही कौतुक केले. या सामन्यादरम्यान कुलदीप यादवला एक विकेट घेण्यात यश आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Team indias ravidra jadeja won the best fielder medal after the win against bangladesh vbm

First published on: 20-10-2023 at 15:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×