बँकॉक : पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या किरण जॉर्ज आणि लक्ष्य सेन यांनी आपली विजयी लय कायम राखताना थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत सायना नेहवाल, अश्मिता चलिहा, तर पुरुष दुहेरीत भारताची आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीचे आव्हान संपुष्टात आले.

लक्ष्यने चीनच्या लि शी फेंगला २१-१७, २१-१५ असे नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर मलेशियाच्या लेओंग जून हाओचे आव्हान असेल. पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत किरणने चीनच्या वेंग हाँग यांगला २१-११, २१-१९ असे सरळ गेममध्ये नमवताना आगेकूच केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला एकेरीत सायनाने चीनच्या हे बिंग जिआओकडून ११-२१,१४-२१ अशी हार पत्करली. अश्मिताला स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून १८-२१, १३-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या मोहम्मद शोशिबूल फिक्री व बेगास मौलाना जोडीने सात्त्विक व चिराग जोडीला २४-२६, २१-११, २१-१७ असे नमवले.