scorecardresearch

Premium

MS Dhoni : माहीने आपल्या मित्राचा वाढदिवस केला साजरा, एकमेकांना केक भरवतानाचा VIDEO व्हायरल

Mahendra Singh Dhoni Video : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

Mahendra Singh Dhoni celebrating his friend's birthday
धोनीने आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mahendra Singh Dhoni celebrating his friend’s birthday : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) च्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. आपल्या आवडत्या सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सामान्यतः क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडूंचे फॅन फॉलोइंग कमी होते, पण धोनीच्या बाबतीत मात्र याच्या उलट घडले आणि त्याचे फॅन फॉलोइंग पूर्वीपेक्षा अधिक वाढले. धोनीला दररोज पाहण्याची चाहत्यांची इच्छा असते. धोनीही चाहत्यांना निराश करत नाही आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो चाहत्यांमध्ये कायम आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये धोनी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

कुशल माही नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरने त्याच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंग धोनी इतर चार जणांसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धोनीच्या शेजारी उपस्थित असलेला त्याचा मित्र वाढदिवसानिमित्त केक कापताना दिसत आहेत. केक कापल्यानंतर तो धोनीला केकही खाऊ घालतो. यावेळी धोनी खूप आनंदी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनीचा लूकही अप्रतिम दिसत आहे. तो स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसत आहे. तो स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसत आहे. धोनीची अप्रतिम शरीरयष्टी चाहत्यांना खूप आवडत आहे.

Hanuma Vihari Leaving AP Cricket Association Politics Leaving Captaincy
Hanuma Vihari : खळबळजनक! भारतीय क्रिकेटपटूला नेत्याच्या मुलावर ओरडणं पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा
Sarfaraz Khan's fans angry with Virender Sehwag's pos
IND vs ENG : जुरेलच्या शानदार खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने मीडियाकडे ‘ही’ मागणी केल्याने सर्फराझचे चाहते संतापले
India badminton player p v Sindhu believes that Olympics are more challenging than before sport news
यंदाचे ऑलिम्पिक पूर्वीपेक्षा आव्हानात्मक! अनुभवाची शिदोरी महत्त्वपूर्ण; भारताची बॅडमिंटनपटू सिंधूचे मत
Video of Rohit's catch In IND vs ENG 2nd Test Match
IND vs ENG : अश्विनच्या चेंडूवर रोहित शर्माने घेतला पोपचा उत्कृष्ट झेल, फलंदाजही झाला चकीत, पाहा VIDEO

एमएस धोनीने गेल्या काही दिवसांपासून त्याचा लूक खूप बदलला आहे. लांब केसांसह तो त्याच्या जुन्या लूकमध्ये दिसत आहे. धोनीही त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. त्याची शरीरयष्टी पूर्वीपेक्षा चांगली दिसत आहे. उल्लेखनीय आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्येच खेळताना दिसत आहे. आगामी आयपीएल २०२४ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा – World Cup 2024 : ‘जर हार्दिक थेट आयपीएल खेळला, तर…’; आशिष नेहराचे टी-२० विश्वचषकातील कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य

एमएस धोनीसाठी बाइक किती जिव्हाळ्याचा विषय याची प्रचिती येते. इतकेच नाही तर धोनीला आलिशान कारची खूप आवड आहे. अशातच काही दिवसांपूर्वी धोनीचा एका आलिशान कार ड्रायव्हिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत झाला होता. त्यात धोनी मर्सिडीज बेंझ जी क्लास (Mercedes Benz G Class)मधून सवारी करताना दिसत होत. या कारची नंबर प्लेट पाहून चाहतेही चकित झाले होते. माहीच्या कारचा क्रमांक ‘JH01FB0007’ आहे. धोनीचा ७ हा गोल्डन नंबर आहे. तसेच त्याच्या जर्सीचा नंबरही ७ आहे आणि त्यामुळेच त्याने कारची नंबर प्लेटही ०७ अशीच घेतली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The video of mahendra singh dhoni celebrating his friends birthday has gone viral vbm

First published on: 02-12-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×