Varanasi Kashi Vishwanath: २३ सप्टेंबर रोजी वाराणसीला पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि कपिल देव ज्यांना क्रिकेटचा देव म्हटले जाते, त्यांनी ‘श्री काशी विश्वनाथ’ मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेतले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन स्टेडियमच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सचिन वाराणसीला गेला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

सचिनने ट्वीट केले की, “एकाची प्रशंसा करत मोठा झालो आणि इतर दोघांसोबत फील्ड शेअर करण्याची संधी मिळाली. त्यांनी १९८३च्या विजयाने पाया घातला आणि २०११मध्ये मला त्याचे फळ मिळाले. आज खूप आनंद होत आहे! आशा आहे की, सध्याचा भारतीय संघ २०२३ मध्ये पुन्हा एकदा ट्रॉफी घरी आणेल.”

Ajit Agarkar's reaction to Hardik
T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याच्या निवडीवर अजित आगरकरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “तो जे करु शकतो त्याचा…”
d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: हार्दिक पंड्याने ‘सल्लागार धोनी’ला दिलं चेन्नईच्या विजयाचं श्रेय
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खेळाडू दाखल झाले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, सुनील गावसकर, बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि दिलीप वेंगसरकर वाराणसीला पोहोचले आहेत. पायाभरणी समारंभाला खेळाडू पोहोचून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. माजी भारतीय क्रिकेटपटूंनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली आहे.

स्टेडियमचे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल

माहितीसाठी की, उत्तर प्रदेशमध्ये बनवले जाणारे वाराणसी स्टेडियम २०२५ पर्यंत तयार होईल. या स्टेडियममध्ये ३०,०००लोकांसाठी बसण्याची जागा असेल. यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आच्छादन, वेलीची पाने आणि डमरूसारखी रचना आणि त्रिशूलच्या आकाराचे फ्लडलाइट्स यासारखे अद्वितीय डिझाइन घटक असतील.

वाराणसी स्टेडियमच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीच्या रिंगरोडजवळ असलेल्या राजतलाब भागातील गंजरी गावात जमीन संपादित करण्यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर स्टेडियमच्या उभारणीसाठी ३३० कोटी रुपयांचा खर्च बीसीसीआय उचलणार आहे. या स्टेडियमची रचना ‘शिवमय’ असेल आणि काशी विश्वनाथची झलक त्याच्या डिझाइनमध्ये दिसेल. स्टेडियममध्ये चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण, ‘त्रिशूल’ आकाराचे फ्लड लाइट, वेलीच्या पानांसारखे डिझाइन पॅटर्न आणि ‘डमरू’च्या आकारात मीडिया सेंटर असेल.

हेही वाचा: World Cup 2023: ‘व्हिसा’मुळे पाकिस्तानच्या विश्वचषक २०२३च्या तयारीवर टांगती तलवार, भारतात येण्याची परवानगी अद्याप नाही मिळाली

वाराणसीमध्ये बांधले जाणारे हे स्टेडियम कानपूरमधील ग्रीन पार्क आणि लखनऊमधील एकना क्रिकेट स्टेडियमनंतर उत्तर प्रदेशातील तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. या स्टेडियमच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हे स्टेडियम वाराणसीमधील हजारो कामगारांसाठी उत्पन्नाचे साधन बनेल, ज्यात आधीच मोठ्या संख्येने पर्यटक येतात. याशिवाय स्टेडियममध्ये येणाऱ्या गर्दीचा चालक आणि खलाशांनाही फायदा होणार आहे.”