आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागणार असून सोमवारी त्यांचा सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत स्पर्धेत छाप पाडता आलेली नसल्याने त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. मुंबईला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत सातत्य राखता आलेले नाही, त्यामुळे त्यांना या दोन्ही आघाडय़ांवर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर संघाचे योग्य समीकरणही त्यांना जुळवावे लागणार आहे.
हैदराबादने आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादची गोलंदाजी चांगली होत असली तरी फलंदाजीमध्ये त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांना यश मिळू शकते.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2014 रोजी प्रकाशित
मुंबईपुढे आज सनरायजर्सचे आव्हान
आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागणार असून सोमवारी त्यांचा सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे.

First published on: 12-05-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today challenge of sunrisers hyderabad in front of mumbai