Tushar Deshpande In Ranji Trophy: रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईने जम्मू – एक काश्मीर संघावर दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडे चमकला. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. मात्र तो आपल्या कामगिरीमुळे नव्हे तर, वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

तुषार देशपांडे मैदानावरच बेशुद्ध झाले होता. त्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला. राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून याबाबत माहिती दिली आहे. हा सामना श्रीनगरच्या शेर -ए-काश्मीर स्टेडियममध्ये पार पडला. जिथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वॉर्मअप करताना तुषार देशपांडेला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला.

त्यानंतर त्याला स्थानिक रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याच्यावर आपत्कालीन उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्याला पुन्हा मैदानात जाता येईल का? अशी शंका होती. पण रॉयल्सने दिलेल्या माहितीनुसार, तो रुग्णालयातून थेट मैदानात आला. शार्दुल ठाकूरसोबत मिळून त्याने वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या हाती घेतली.

तुषार देशपांडे पूर्णपणे फिट नव्हता. तरीदेखील तो दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. त्याने ३५ षटके टाकली. राजस्थान रॉयल्ससोबत बोलताना तो म्हणाला की, “हा माझ्यासाठी हा आमच्या संघासाठी हा अतिशय महत्वाचा सामना होता. गेल्या हंगामात जम्मू-काश्मीरने आम्हाला पराभूत केलं होतं. त्यामुळे आम्हाला या हंगामाची सुरुवात त्यांना पराभूत करायची होती. माझ्यासाठी सुद्धा हा सामना महत्वाचा होता. कारण मी दीड वर्षानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुनरागमन करत आहे.”

या सामन्यात जम्मू- काश्मीर संघाकडून राजस्थान रॉयल्स संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पारस डोगराने १४४ धावांची दमदार खेळी केली होती. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईने ६१ धावांची आघाडी घेतली. तुषार देशपांडेने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले.