IND vs AUS 4th Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी २०८ धावांची भागीदारी करून मोठा विक्रम रचला आहे. त्याचबरोबर आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने मोडला ६३ वर्ष जुना विक्रम –

उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतीय भूमीवर २०८ धावांची भागीदारी करून ६३ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. आजच्याच दिवशी ६३ वर्षांपूर्वी नॉर्म ओ’नील आणि नील हार्वे या जोडीने मुंबईत भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियासाठी २०७ धावांची भागीदारी केली होती. आता २०२३ मध्ये म्हणजेच ६३ वर्षांनंतर ग्रीन-ख्वाजा यांनी २०८ धावांची भागीदारी करून या दिग्गजांचा मोठा विक्रम मोडला आहे.

किम ह्युजेस आणि अॅलन बॉर्डरच्या नावावर सर्वात मोठी भागीदारी –

भारतातील कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम किम ह्युजेस आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे, ज्यांनी १९७९-८० मध्ये चेन्नई येथे २२२ धावा केल्या होत्या. आता या प्रकरणात ग्रीन आणि ख्वाजा ही जोडी २०८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या सामन्यात सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी २०८ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. त्यांतर कॅमेरून ग्रीन ११४ धावांवर बाद झाला.

भारतात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी भागीदारी –

२२२ किम ह्युजेस – अॅलन बॉर्डर, चेन्नई १९७९-८०
२०८ उस्मान ख्वाजा – कॅमेरून ग्रीन, अहमदाबाद २०२२-२३
२०७ नॉर्म ओ’नील – नील हार्वे, मुंबई १९५९-६०
२०१३ पासून भारताविरुद्ध २०० पेक्षा अधिक भागीदारी –
२०० डी सिबली – जो रूट, चेन्नई २०२१
२०८ उस्मान ख्वाजा – कॅमेरून ग्रीन, अहमदाबाद २०२३

हेही वाचा – SL vs NZ 1st Test: श्रीलंकेने वाढवली टीम इंडियाची चिंता; फलंदाजीनंतर गोलंदाजीतही केला धमाका

अहमदाबादमधील चौथ्या कसोटीतील धावसंख्या –

सामन्याबद्दल बोलायचे तर, अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात १४३ षटकानंतर ७ विकेट गमावून ४०४ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा १७७ धावांवर खेळत आहे तर नॅथन लियॉन ५ धावांवर नाबाद आहे. भारतासाठी या सामन्यात आतापर्यंत रविचंद्रन अश्विनने ४ तर मोहम्मद शमीने २ आणि जडेजाने १ बळी घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usman khawaja and cameron green partnership broke the record 63 years ago in ind vs aus 4th test vbm
First published on: 10-03-2023 at 14:29 IST