Vaibhav Suryavanshi Friend Hits 327 in 134 Balls: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये धमाकेदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर भारताच्या अंडर-१९ संघामध्ये त्याची इंग्लंड दौऱ्यावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान वैभव एनसीएमधील सराव सत्रातही वादळी फटकेबाजी केली आहे. आता त्याच्या १३ वर्षीय मित्राने वादळी फटकेबाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

वैभव सूर्यवंशीनंतर बिहार क्रिकेटमधून एक नवीन स्टार खेळाडू उदयास येत आहे. वैभव सूर्यवंशीचा मित्र १३ वर्षीय अयान राजने एका सामन्यात ३२७ धावा केल्या आहेत. या खेळाडूने फक्त १३४ चेंडूत ३२७ धावांचा टप्पा गाठला, ज्यात चौकार-षटकारांची लयलूट झाली.

वैभवने अलीकडेच आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना धमाल केली. त्याने त्याच्या स्फोटक स्ट्राईक रेटने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि ३५ चेंडूत शतक ठोकले. वैभव १४ वर्षांचा आहे आणि तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत होता.

मुझफ्फरपूरचा असलेल्या अयानने जिल्हा क्रिकेट लीगमध्ये संस्कृती क्रिकेट अकादमीकडून खेळताना त्रिशतक झळकावले. त्याच्या खेळीत ४१ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश होता. त्याच्या ३२७ धावांपैकी २९६ धावा चौकार आणि षटकारांनी केल्या होत्या. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २५० च्या जवळपास होता. त्याने ही खेळी ३० षटकांच्या सामन्यात खेळली.

अयान राज त्याच्या वादळी खेळीनंतर म्हणाला की वैभव हा त्याचा जवळचा मित्र आणि सर्वात मोठं प्रेरणास्थान आहे. दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना क्रिकेट खेळायला आवडतं. अयान म्हणाला की जेव्हा जेव्हा तो वैभवशी बोलतो तेव्हा तो त्याला खेळात पुढे जाण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तो म्हणाला, ‘मी जेव्हा जेव्हा वैभवशी बोलतो तेव्हा मला वेगळीच प्रेरणा मिळते. आम्ही लहान असताना एकत्र खेळायचो. आज त्याने मोठं नाव कमावलं आहे आणि मीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अयान त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे वडील एक क्रिकेटपटू होते आणि एकेकाळी भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहत होते पण ते यशस्वी झाले नाहीत. आता अयानला भारतीय संघासाठी खेळत त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे.