scorecardresearch

Premium

ENG vs NED, World Cup 2023: जो रुट विचित्र पद्धतीने ‘क्लीन बोल्ड’ झाल्याने चाहत्यांनी धरलं डोकं, VIDEO होतोय व्हायरल

Cricket World Cup 2023, ENG vs NED Match Updates: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात जो रुट ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून इंग्लिश संघाच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली.

ENG vs NED World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
जो रुट नेदरलँड्सविरुद्ध क्लीन बोल्ड (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

England vs Netherland ICC Cricket World Cup 2023 Match Updates: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज (बुधवार) एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४०वा सामना खेळला जात आहे. या विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रूट डच गोलंदाज लोगान व्हॅन बीकच्या चेंडूवर अशा पद्धतीने बाद झाला की, ज्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांनी आपले डोकेच धरले. जो रुट ज्या विचित्र पद्धतीने बाद झाला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज रूटने गेल्या पाच डावात केवळ २९ धावा केल्या होत्या, पण नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने डेविड मलानसोबत दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनी जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर ८५ धावांची भागीदारी रचली. २१व्या षटकात लोगान व्हॅन बीकने जो रुटला क्लीन बोल्ड केले. जो रूट ३४ चेंडूत २८ धावा करुन बाद झाला.

Aakash Chopra's statement on Hardik Pandya
IPL 2024 : “मला वाटते गुजरातच्या चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करावे…”, माजी खेळाडूचे हार्दिक पंड्याबाबत मोठे वक्तव्य
cricket tournament in Raigad
रायगडमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून मतांची बेगमी
MS Dhoni jersey number
“त्या दिवशी आई-वडिलांनी…”, धोनीने सांगितलं ७ नंबरची जर्सी का निवडली? चाहत्यांकडून ‘Thala for a reason’चा ट्रेंड
Rahul Dravid believes that Ishan needs to start playing for selection
निवडीसाठी इशानला खेळण्यास सुरुवात करण्याची गरज- द्रविड

२१व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लोगानने एक साधा लेंथ चेंडू टाकला, जो खेळपट्टीवर पडल्यानंतर आत आला. या चेंडूवर रुट बरेच शॉट्स खेळू शकला असता, पण इंग्लिश फलंदाज रूटने रिव्हर्स लॅपसारखा अपारंपरिक शॉट निवडला. त्यामुळे चेंडू त्याच्या दोन्ही पायातून गेला आणि स्टंपवर आदळला. यानंतर रुटला काय झाले ते समजलेच नाही. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला अशा पद्धतीने बाद होताना पाहून कमालीचे निराश झाले.

हेही वाचा – Bhuvneshwar Kumar: वर्ल्ड कपदरम्यान भुवनेश्वर कुमारचे चमकले नशीब, ‘या’ मालिकेतून टीम इंडियात करणार पुनरागमन?

रूटच्या एकदिवसीय विश्वचषक मोहिमेची सुरुवात न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतकांनी झाली होती परंतु तेव्हापासून संघाच्या उर्वरित खेळाडूंसह त्याचा फॉर्मही खराब झाला होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने २० षटकांनंतर १३२-१ धावा केल्या होत्या, परंतु नेदरलँड्सने जो रूट आणि डेविड मलान यांच्या विकेट्स घेत शानदार पुनरागमन केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of joe root being clean bowled strangely in the match against netherlands has gone viral vbm

First published on: 08-11-2023 at 17:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×