scorecardresearch

Premium

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुदच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज! रिंकू सिंगने सांगितला सराव सत्रातला अनुभव

Team India South Africa Tour : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडूने दक्षिण आफ्रिकेती आपला अनुभव सांगितला आहे.

IND vs SA T20 Series Updates in marathi
रिंकू सिंगने सांगितला दक्षिण आफ्रिकेतील अनुभव (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

BCCI shared the video of Rinku Singh in South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील आव्हानासाठी टीम इंडियाचे खेळाडू सज्ज आहेत. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार आहे. त्याचवेळी या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंगने आपली प्रतिक्रिया दिली. रिंकू सिंगने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचे हवामान अप्रतिम आहे, ते आमचे पहिले सराव सत्र होते, खूप मजा आली. तो म्हणाला की ‘राहुल सरांसोबत काम करायला मिळाले, खूप छान वाटत होतं. सरांनी सांगितले की, तू जसा खेळत आला आहेस, तसाच खेळत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेव.’

रिंकू सिंग पुढे म्हणाला की, ‘राहुल सरांनी सांगितले की, तू जिथे खेळतो त्या पाच आणि सहा क्रमांकावर खेळणे सोपे नसते, पण स्वतःवर आत्मविश्वास ठेवून खेळत राहावे लागते.’ रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेत नेटमध्ये फलंदाजी करताना त्याला कसे वाटले हे देखील सांगितले. रिंकू सिंगने म्हणाला की, ‘भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेमध्ये अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या आहेत. याशिवाय वेग अधिक आहे, मला वाटले की मी जितका वेग वापर करेल तितके चांगले राहिल.’

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी
U19 World Cup Semi Final 2024 IND vs SA Match Updates in marathi
U19 World Cup 2024 : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

याशिवाय रिंकू सिंगने सांगितले की, मी २०१३ पासून उत्तर प्रदेशसाठी मधल्या आणि खालच्या फळीत फलंदाजी करत आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नाही, आता मी त्या क्रमांकावर जुळवून घेतले आहे.


रिंकू सिंगने सांगितले की, मधल्या फळीत फलंदाजी करणे सोपे नसते, परंतु मी नेहमीच मनाची तयारी करतो आणि स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय रिंकू सिंगने व्हिडीओमध्ये सांगितले की, सध्या भारतीय संघाचे वातावरण कसे आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपले प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – WPL 2024 : स्मृती मंधाना ते ऍशले गार्डनरपर्यंत ‘या’ पाच क्रिकेटपटू आहेत डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sa t20 series bcci has shared the video of rinku singh who is on the tour of south africa vbm

First published on: 09-12-2023 at 13:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×