scorecardresearch

Premium

WPL 2024 : स्मृती मंधाना ते ऍशले गार्डनरपर्यंत ‘या’ पाच क्रिकेटपटू आहेत डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू

WPL 2024 Auction Updates : यंदा महिला प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावात सर्वात महागडी क्रिकेटर कोण ठरते, हे पाहणे मनोरंजक ठरेल. लिलाव पूलमध्ये वेदा कृष्णमूर्ती, किम गर्थ, डायंड्रा डॉटिन, अॅनाबेले सदरलँड किंवा चमरी अटापट्टू यांच्यासह अनेक मोठे खेळाडू आहेत

WPL 2024 Auction Updates in marathi
डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू (फोटो-डब्ल्यूपीएल एक्स)

Five most expensive female cricketers in WPL 2023 : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव आज होणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत जगभरातील अनेक उल्लेखनीय महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक लीगची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती. अशा परिस्थितीत पहिल्या लिलावात काही खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली होती. पहिल्या डब्ल्यूपीएल लिलावात सर्वात महागड्या ठरलेल्या पहिल्या पाच महिला खेळाडू कोण होत्या, याबद्दल जाणून घेऊया.

१. स्मृती मंधाना

भारताची स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) ने ३.४ कोटी रुपयांना विकत घेतली आणि तिची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. मंधानाला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा लागली होती. मात्र, आरसीबीने बोली सुरूच ठेवली आणि सर्वात महागडी बोली लावून मंधानाला आपल्या संघात समावेश केला. मात्र, गेल्या मोसमात आरसीबीची कामगिरी काही विशेष झाली नाही.

Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
IND vs ENG 1st test match updates in marathi
IND vs ENG : ‘आधी पॅड की बॅट…’, रवींद्र जडेजाच्या एलबीडब्ल्यू आऊटवरुन निर्माण झाला गोंधळ
Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल
rohan bopanna, top performance, tennis, Australian Open 2024
विश्लेषण : वय ४३ वर्षे, तरीही टेनिसमध्ये अव्वल स्थानावर! भारताच्या रोहन बोपण्णाची कामगिरी का ठरली खास?

२. ऍशले गार्डनर

ही ऑस्ट्रेलियन खेळाडू जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. गुजरात जायंट्सने या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला संघाच्या बॅटिंग लाइनअपमध्ये अनुभव जोडण्यासाठी खरेदी केले होते, जी संघाच्या गरजेनुसार खेळण्यात पारंगत आहे. गार्डनरची खास गोष्ट म्हणजे ती कधीही कोणत्याही गोलंदाजाला चौकार आणि षटकार मारू शकते. गुजरातप्रमाणेच इतर फ्रँचायझीदेखील गार्डनरला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र, गुजरात जायंट्सने मोठी बोली लावत ३.२ रुपयांना खरेदी केले.

हेही वाचा – WPL 2024 Auction : डब्ल्यूपीएलच्या लिलावात ‘या’ पाच भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर होऊ शकतो पैशांचा पाऊस

३. नॅट शिव्हर्स-ब्रंट

इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही. मुंबईला मधल्या फळीत झंझावाती फलंदाजीबरोबरच गोलंदाजीचा उत्तम पर्याय हवा होता आणि नॅटशिव्हर्सपेक्षा चांगला पर्याय कोणीही नव्हते. त्यामुळे गार्डनरला खरेदी करता न आल्याने मुंबईने नॅट शिव्हर्स-ब्रंट भरपूर पैसा खर्च करून त्याला लिलावात ३.२ कोटी रुपयांना विकत घेतले.

४. शफाली वर्मा

भारताची सर्वात स्फोटक फलंदाज शफालीवर चांगली बोली लागणार हे सर्वांनाच माहीत होते. तिला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि २.६ कोटी रुपयांना विकत घेतले. शफालीने गेल्या मोसमातही अनेक आक्रमक इनिंग खेळल्या, त्यामुळेच दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

हेही वाचा – WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या

५. जेमिमा रॉड्रिग्ज

शफालीशिवाय दिल्लीला मधल्या फळीत भरवशाच्या फलंदाजाची गरज होती. जेमिमा सध्या भारतीय मधल्या फळीतील सर्वात तेजस्वी फलंदाज आहे. त्याचबरोबर ती एक चपळ क्षेत्ररक्षक देखील आहे. कॅपिटल्सने तिच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी २.२ कोटी रुपये खर्च केले. भविष्यात जेमिमा दिल्लीचे कर्णधारपद भूषवतानाही दिसू शकते. सध्या दिल्लीचे कर्णधारपद मेग लॅनिंगच्या हाती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who were the five most expensive female cricketers in the first season of the womens premier league 2023 vbm

First published on: 09-12-2023 at 12:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×