Third Umpire Press Wrong button : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या बिग बॅश लीग २०२३-२४ मध्ये आतापर्यंत अनेक विचित्र घटन मैदानावर पाहायला मिळाली आहेत. या मोसमातील २८ वा सामना सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झाला. शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात असे काही घडले, ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला. सामन्यादरम्यान तिसऱ्या पंचाने चुकीचे बटण दाबले आणि त्यानंतर फलंदाजाला बाद घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र या घटनेने क्रिकेट जगताला धक्का बसला असून आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना सिडनी सिक्सर्स संघ फलंदाजी करत असताना घडली. यादरम्यान मेलबर्न स्टार्सचा फलंदाज जेम्स विन्सने थेट गोलंदाज इमाद वसीमच्या दिशेने शॉट मारला. यानंतर चेंडू थेट स्टंपला लागला आणि विरोधी संघाने धावबाद होण्याचे अपील केले. त्यानंतर हे प्रकरण मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाकडे पाठवले.

रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की जोश फिलिप नॉन-स्ट्रायकरच्या एंडला चेंडू स्टंपवर आदळण्यापूर्वी क्रीजच्या आत पोहोचला होता, परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. यामुळे मैदानावर उपस्थित खेळाडूंशिवाय स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक आणि सपोर्ट स्टाफही हे पाहून आश्चर्यचकित झाले. मात्र, यानंतर फलंदाजाला क्रीजवर थांबण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर त्याला नाबाद घोषित करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्स लीगला खूप ट्रोल करत आहेत.

हेही वाचा – VIDEO : मोहम्मद रिझवानने ‘पिंक टेस्ट’नंतर मॅकग्रा फाऊंडेशनच्या महिलांशी हस्तांदोलन करण्यास दिला नकार

या सामन्याबद्दल बोलायचे, तर मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या. सिडनी सिक्सर्सने हे लक्ष्य केवळ १८.१ षटकांत पूर्ण केले. सिडनीकडून जेम्स विन्सने ७९ धावांची शानदार खेळी केली. विन्सने ५७ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने शानदार खेळी साकारली. त्याच्याशिवाय डॅनियल ह्यूजने ३२ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. या विजयानंतर सिडनी सिक्सर्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of third umpire reversing decision by pressing the wrong button and declaring the batsman not out in bbl match vbm
First published on: 07-01-2024 at 17:58 IST