Jay Shah’s reaction on Rahul Dravid : टीम इंडिया २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर राहुल द्रविडचा कोचिंग कार्यकाळ संपला होता, परंतु टी-२० विश्वचषक पाहता बोर्ड आणि द्रविड यांनी परस्पर संमतीने तो वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून बीसीसीआय लवकरच प्रशिक्षकपदासाठी जाहिरात जारी करणार आहे.

राहुल द्रविडचा कार्यकाळ फक्त जूनपर्यंत –

राहुल द्रविड २०२१ पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा करार या वर्षी जूनमध्ये संपत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी बुधवारी मुंबईत ही माहिती दिली. क्रिकबझने जय शाहचा हवाला देत म्हटले आहे की, “राहुल द्रविडचा कार्यकाळ फक्त जूनपर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना अर्ज करायचा असेल, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत.” कोचिंग स्टाफमधील इतर सदस्य, जसे की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, नवीन प्रशिक्षकाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडले जातील. यादरम्यान जय शाह यांनी परदेशी प्रशिक्षकाची शक्यता नाकारली नाही आणि हा मुद्दा खुला सोडला.

परदेशी प्रशिक्षकाबाबत जय शाह म्हणाले, “नवा प्रशिक्षक भारतीय की परदेशी असेल हे आम्ही ठरवू शकत नाही. ते सीएसीवर अवलंबून असेल आणि आम्ही जागतिक संघटना आहोत.” मात्र, यावेळी त्यांनी स्पष्टपणे सूचित केले की, बोर्ड वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करेल अशी शक्यता नाही. सध्या ही प्रणाली इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि अगदी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सारख्या मंडळांनी स्वीकारली आहे.

हेही वाचा – PBKS vs RCB : पंजाबची धाव प्राथमिक फेरीपुरतीच; बंगळुरूचा मोठा विजय

जय शाह पुढे म्हणाले, “हा निर्णयही सीएसी घेणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत असे अनेक सर्व फॉरमॅट खेळाडू आहेत. शिवाय, भारतात अशा परिस्थितीचे कोणतेही उदाहरण नाही.” जय शाह यांनी देखील पुष्टी केली की नवीन प्रशिक्षक दीर्घ कालावधीसाठी नियुक्त केला जाईल आणि तीन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी काम करेल. यावेळी, जय शाह यांनी आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरू ठेवण्याबाबत कोणतीही वचनबद्धता दर्शविली नाही. त्याचबरोबर कर्णधार आणि प्रशिक्षकांशी बोलल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तथापि, त्यांनी नियमाच्या महत्त्वावर जोर दिला, ज्यामुळे दोन अतिरिक्त भारतीय खेळाडूंना आयपीएल संघाच्या अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते.

हेही वाचा – PBKS vs RCB : विराट कोहलीने रायली रुसोच्या सेलिब्रेशनची नक्कल करत दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल

इम्पॅक्ट प्लेयर नियम कायमस्वरूपी नाही –

इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत जय शाह म्हणाले, “इम्पॅक्ट प्लेयर नियम हा एक चाचणी केस होता. दोन नवीन भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळत आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की हा नियम अष्टपैलू खेळाडूंच्या बाजूने नाही. ते म्हणाले, “इम्पॅक्ट प्लेयरच्या सातत्यबाबत निर्णय घेण्यापूर्वी आम्ही स्टेकहोल्डर्स, फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर्स यांच्याशी चर्चा करू. “हा नियम कायमस्वरूपी नाही, परंतु या नियमाविरुद्ध कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.”