Video : पाहा, केदार जाधवचं पुण्यातलं अलिशान घर

BCCI ने शेअर केला खास व्हिडीओ

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन वर्षात आव्हानासाठी सज्ज झालेला आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेनंतर भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू केदार जाधवची या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकेआधी बीसीसीआयने केदार जाधवच्या पुण्यातील अलिशान घराचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर होणार आहे, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने केदार जाधवच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी दिली आहे. पाहा केदारच्या या अलिशान घराचा व्हिडीओ….

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया –

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video sneak peek of kedar jadhavs house psd

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या