Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: अखेर आशिया चषक २०२३ची सांगता झाली. १९ दिवस चाललेल्या या स्पर्धेत १३ सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव ५० धावांवर आटोपला. भारताने ६.१ षटकात १० विकेट्स राखून सामना जिंकला. मात्र, सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजने अशी काही कृती केली की भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला हसू अनावर झाले, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

श्रीलंकेविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने जबरदस्त सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने आपल्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात श्रीलंकेच्या एक-दोन नाही तर तब्बल चार विकेट्स घेतल्या. भारतासाठी सिराजचे हे प्रदर्शन अतिशय महत्वाचे आठरले. पण तरीही विराट कोहली आणि शुबमन गिल सिराजवर हसताना दिसले. त्याने संपूर्ण सामन्यात २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. तसेच, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले.

भारताने आशिया चषक २०२३च्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावली. नाणेफेक जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार दासुन शनाका (०) याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण संघाची धावसंख्या १२ असताना श्रीलंकेच्या पहिल्या ६ विकेट्स गेल्या होत्या. यातील १० पैकी एकट्या मोहम्मद सिराज ६ विकेट्स घेतले. श्रीलंकेच्या डावातील चौथे षटक निर्णायक ठरले. या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता आणि चार विकेट्स घेतल्या.

हे षटक श्रीलंकेला सामन्यातून दूर घेऊन गेले. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर धनंजया डी सिल्वाने चौकार मारला. डी सिल्वाने मैदानात लेग साईडला हा शॉट खेळल्यामुळे चेंडू अडवण्यासाठी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. कारण, विकेट्स पडत असल्याने ३ स्लिप आणि एक गली असे खेळाडू फलंदाजाच्या मागे झेल घेण्यासाठी उभे होते. त्यामुळे अशात सिराजने स्वतः हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला, पण चौकार गेला. चेंडू अडवण्यासाठी सिराज चक्क सीमारेषेपर्यंत धावला. गोलंदाज स्वतः चेंडू अडवण्यासाठी सीमारेषेपर्यंत धावण्याची ही बहुदा पहिली वेळ असू शकते. मैदानातील हे चित्र पाहून अनेकांना हसू आले. मैदानात उपस्थित विराट कोहली आणि शुमबन गिल यांनाही हसू रोखता आले नाही. विराट आणि गिल हसतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: IND vs SL, Asia Cup Final: भारताची ऐतिहासिक कामगिरी! सिराजच्या तुफानी गोलंदाजी पुढे श्रीलंकेचे लोटांगण, टीम इंडियाने आठव्यांदा आशिया कपवर कोरले नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिराजचे पहिले पंचक म्हणजेच फाईव्ह विकेट हॉल

सिराजने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या. म्हणजे त्याने पहिल्यांदाच वन डेत पाच विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने १२ धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. सहा विकेट्स गमावल्यानंतर वन डेमधली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. त्याचवेळी श्रीलंकेने अवघ्या १२ धावांत पाच विकेट्स गमावल्याने एक नवा विक्रम भारताच्या नावावर झाला. फायनलमध्ये पाच विकेट्स गमावल्यानंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे.