Virat Kohli Dance on Nepali Song Video Viral: आशिया चषकात भारतीय संघ आपला दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नेपाळने पहिल्या १० षटकात ६५ धावा केल्या. नेपाळच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. या काळात भारताचे खराब क्षेत्ररक्षणही पाहायला मिळाले. संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीनेही एक झेल सोडला, मात्र कोहलीने तो बाजूला ठेवत सामन्यावर लक्ष केंद्रित केले आणि अतिशय मस्त पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. यादरम्यान विराट एका नेपाळी गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसला.

षटकाच्या मधल्या ब्रेकदरम्यान विराटने केला डान्स –

विराट कोहलीचा एक व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेपाळच्या फलंदाजीचे १४ वे षटक संपल्यानंतरचा आहे. षटक संपल्यानंतर बाजू बदलली जात होती आणि कर्णधार रोहित नवीन गोलंदाजाकडे चेंडू सोपवत होता. दरम्यान, कोहलीला स्टेडियममध्ये वाजणारे नेपाळी गाणे इतके आवडले की, तो या गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. विराट बराच वेळ गाण्यावर थिरकताना दिसला.

कोहलीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया –

विराट कोहलीने नेपाळी गाण्यांवर केलेल्या डान्स मूव्ह्सने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराटचा हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहतेही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने लिहिले, “कोहली म्हणजे खेळ, गाणे आणि नृत्य या तिन्हींचा आनंद एकाच वेळी देणार.”

हेही वाचा – 800 Teaser: मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर झाला लॉन्च, ५ सप्टेंबरला सचिन तेंडुलकर रिलीज करणार ट्रेलर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेपाळची चांगली सुरुवात –

या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने फलंदाजीला उतरून चांगली सुरुवात केली. कुशल भुरटेल आणि आसिफ शेख या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. मात्र यादरम्यान दोघांचे एकूण तीन झेल सुटले. हे झेल विराट, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी फोडले. शार्दुल ठाकूरने कुशलला बाद करून ही भागीदारी तोडली. आसिफ शेखने अर्धशतक झळकावले आणि ५८ धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. कुशालने ३८ धावांची खेळी केली.