Babar Azam on Virat Kohli: जागतिक क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम यांची तुलना होताना दिसत आहे. तसेच, २०१९ सालानंतर विराट कोहलीचा फॉर्म तिन्ही फॉरमॅटमध्ये खूपच खराब होता, ज्यामध्ये त्याला जवळपास २ वर्षे एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही. त्याच्या खराब फॉर्ममध्ये, २०२२ मध्ये, बाबर आझमने कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियावर ट्विट केले आणि लिहिले की “ही वेळ निघून जाईल.”

२०२२ मध्ये भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली बॅटने अजिबात कमाल दाखवू शकला नव्हता. अशा स्थितीत त्यांना चहूबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आता त्याच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटवर मौन तोडले आहे. बाबर यांनी हा मेसेज सोशल मीडियावर का टाकला हे सांगितले.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

आयसीसी डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत बोलताना बाबर आझम म्हणाले की, “एक खेळाडू म्हणून अशा कठीण काळातून जाता येते. त्या वेळी मला वाटले की, जर मी त्यांना ट्विट करून प्रोत्साहन दिले तर त्याचा त्यांना फायदा होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. एक खेळाडू म्हणून, तुम्हाला प्रत्येक खेळाडूला पाठिंबा द्यायचा आहे जो वाईट टप्प्यातून जात आहे.” पाक कर्णधार पुढे म्हणाला की, “फक्त कठीण काळातच तुम्हाला कळते की इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. या क्षणी, मला वाटले की मी हे केले पाहिजे आणि कदाचित त्यातून काही सकारात्मक गोष्टी बाहेर येतील जे एक प्लस पॉइंट आहे.”

हेही वाचा: IND-W vs WI-W T20 WC: WPL मध्ये सर्वाधिक बोली लागलेली स्मृती मंधाना आजच्या सामन्यात खेळणार? कशी असेल प्लेईंग-११

कोहलीने आशिया चषकामध्ये शतक झळकावून शतकाचा दुष्काळ संपवला

२०२२ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतकाची प्रतीक्षा संपवली. यानंतरही त्याने वन डेत ३ शतके झळकावली. तसेच, त्याचे कसोटी स्वरूपातील शेवटचे शतक २०१९ साली बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या मैदानावर झाले होते. सर्व क्रिकेट चाहते त्याच्या पुढील कसोटी शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.