Virat Kohli revealed about Dhoni Message:विराट कोहली अनेकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या त्याच्या बॉन्डबद्दल बोलतो. या दोन खेळाडूंमधील मैत्री मैदानात असो वा बाहेर सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी, जेव्हा कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात होता, तेव्हा फक्त माहीने त्याला प्रोत्साहन दिले होते. अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी आरसीबीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर विराट कोहलीचा एक पॉडकास्ट पोस्ट केला. ज्यामध्ये विराटने वाईट टप्प्यातून जात असताना, धोनीने पाठवलेल्या मेसेबद्दल खुलासा केला आहे.
विराट कोहली या पॉडकास्टमध्ये म्हणाला, “एमएस धोनी हा एकमेव व्यक्ती होता, ज्याने २०२२ मध्ये माझ्या बॅड पॅचदरम्यान माझ्याशी संवाद साधला होता. त्यामुळे धोनीशी प्योर बॉन्ड असणे माझ्यासाठी आशीर्वाद आहे.”
माजी कर्णधार पुढे म्हणाला, “एकदा महेंद्रसिंग धोनीने मला टेक्स्ट मेसेज पाठवला होता. माही भाई मला मेसेज करुन विचारपूस करणारा एकमेव व्यक्ती होता. जेव्हा लोक तुम्हाला विचारायला विसरतात की तुम्ही कसे आहात. या मेसेजमुळे मला खूप काही समजण्यास मदत झाली.” धोनीच्या या गोष्टी त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळा बनवतात. जेव्हा माजी क्रिकेटपटू आणि तज्ञ कोहलीच्या लीन पॅच दरम्यान सोशल मीडिया आणि टीव्हीवर ज्ञान देत होते, तेव्हा धोनी थेट कोहलीसोबत संवाद साधला होता. कोहलीने पत्रकार परिषदेतही हे मान्य केले होते.
किंग कोहली धोनीबद्दल पुढे म्हणाला, “मला एमएस धोनीबद्दल खूप आदर आहे. त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी त्याच्याशी कोणत्याही परिस्थितीबद्दल बोलू शकतो. या वस्तुस्थितीचा मी नेहमीच आदर करतो.”
धोनी माझा फोन उचलत नाही –
कोहलीने खुलासा केला की धोनीशी संपर्क खूप कठीण आहे. तो माझ्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही क्वचितच त्याच्याकडे पोहोचो शकता. कारण जर मी कोणत्याही दिवशी त्याला कॉल केला, तर ९९ टक्के तो उचलणार नाही. कारण तो फक्त फोनकडेच पाहत नाही.
हेही वाचा – PSL 2023: धक्कादायक! लाइव्ह सामन्यात बाबर आझम हसन अलीला मारण्यासाठी बॅट घेऊन धावला, पाहा VIDEO
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यापासून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टी-२० नंतर कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्येही सलग शतके झळकावली. क्रिकेटच्या जुन्या फॉरमॅट म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या शतकाचा दुष्काळ अजूनही कायम आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. पहिल्या दोन कसोटीत कोहलीची बॅट शांत राहिली असली तरी आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.