Virat Kohli Saying Selfie Next Time Video Viral: विराट कोहली हा भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रत्येक चाहत्याला कोहलीसोबत सेल्फी घ्यायचा असतो. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली त्याच्या एका चाहत्याला पुढच्या वेळी सेल्फी देण्याचे वचन देताना दिसत आहे.

विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये किंग कोहली त्याच्या कारमध्ये बसायला जात आहे आणि मागून एक फॅन धावत येतो आणि सेल्फी मागतो, त्यावेळी हे ऐकून विराट चाहत्याला पुढच्या वेळी २५ तारखेला सेल्फी देतो. कोहलीचे म्हणणे ऐकल्यानंतर त्याचा चाहता म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर विराट कोहली आपल्या गाडीत बसला. या संभाषणाचा व्हिडीओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली अनेकदा चाहत्यांना सेल्फी आणि ऑटोग्राफ देताना दिसतो. कोहली मैदानात आणि मैदानाबाहेर त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. विराट कोहलीला सध्या टीम इंडियातून विश्रांती देण्यात आली आहे. तो ३० ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ मधून कमबॅक करणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने झळकावले होते शतक –

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेत विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. दुसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले. दोन कसोटी सामन्यांच्या २ डावात त्याने ९८.५० च्या सरासरीने १९७ धावा केल्या. त्यानंतर वनडे मालिकेतही विराट कोहली टीम इंडियाचा भाग होता, मात्र त्याला पहिल्या सामन्यानंतर उर्वरित दोन सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

हेही वाचा – Virat Kohli; “माझ्या सोशल मीडियावरील कमाईबद्दलच्या बातम्या खऱ्या नाहीत”; विराट कोहलीने ट्विटरवरुन केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिया कपसाठी कोहली श्रीलंकेला जाणार –

३० ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठी विराट कोहली भारतीय संघासोबत श्रीलंकेला जाणार आहे. आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंका आणि पाकिस्तानकडे आहे, पण टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार असून या सामन्याद्वारे विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करेल.