Virat Kohli Selfie with Tamil Actress Radhika SharathKumar: भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी चेन्नईत दाखल झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हे वरिष्ठ खेळाडूही संघापाठोपाठ दाखल झाले. विराट कोहली सध्या लंडनमध्ये पत्नी आणि मुलांबरोबर राहत आहे आणि या कसोटी मालिकेसाठी आता तो भारतात परतला आहे. यादरम्यान विराट कोहलीचा तमिळ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्याबरोबरचा सेल्फी सध्या व्हायरल होत आहे. राधिका सरथकुमार यांनी हा सेल्फी पोस्ट केला असून या फोटोचं कॅप्शनही लक्ष वेधणार आहे.

विराट कोहली आगामी कसोटी सामन्यासाठी चेन्नई येथे भारतीय क्रिकेट संघात सामील झाला आहे. तीन वर्षांतील त्याचा भारतातील हा पहिला कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी तो पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका कोहली आणि मुलगा अकाय कोहलीसोबत लंडनमध्ये वेळ घालवताना दिसला होता.

हेही वाचा – ‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’

लंडन ते चेन्नई या फ्लाइटमध्ये अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीदरम्यान विराटबरोबर त्यांनी सेल्फी काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. या भेटीला कॅप्शन देताना अभिनेत्रीने लिहिले की, विराट कोहली हा असा एक माणूस आहे ज्याने करोडोची मने जिंकली आणि खेळाप्रतीच्या त्याच्या वचनबद्धतेमुळे आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. विराटबरोबर प्रवास करणं एक चांगला अनुभव होता. सेल्फीसाठी थँक्यू.

हेही वाचा – कोण आहेत टीम इंडियाचे भावी विराट-रोहित? पियुष चावलाने सांगितली ‘या’ दोन खेळाडूंची नावं

राधिका शरथकुमार यांनी फोटो शेअर करताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लाईक, कमेंट्सचा तर चाहत्यांनी वर्षाव केला आहे. राधिका शरथकुमार या तमिळ चित्रपट इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. राधिका सरथकुमार यांनी अनेक तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं. राधिका यांचंही क्रिकेटशी नातं आहे कारण त्यांचा जावई हा भारतीय क्रिकेटपटू आहे. राधिका शरथकुमार यांच्या मुलीने जिचं नाव रायने आहे, तिने क्रिकेटपटू अभिमन्यू मिथुनशी लग्न केलं आहे. तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

हेही वाचा – भलत्याच आकाराची बॅट वापरल्याने इंग्लंडमधल्या काउंटीत इसेक्सला फटका; काय आहेत बॅटच्या आकाराचे नियम?

View this post on Instagram

A post shared by Abhimanyu Mithun (@amithun_25)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाला बांगलादेशविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला चेन्नई येथे सुरू होणार आहे. भारतीय संघ येत्या काही महिन्यांमध्ये घरच्या मैदानावर अनेक कसोटी, टी-२० सामने खेळताना दिसणार आहे.