जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याला विश्रांती देण्यात आली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो खेळला नव्हता. यानंतर, त्याला मालिकेतील पहिल्या कसोटीतूनही विश्रांती देण्यात आली होती. आता मुंबईत होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो संघात सामील होणार आहे. दरम्यान, रविवारी त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा नदीकिनारी बसलेली दिसत आहे.
विराट कोहलीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ”जेव्हा तू माझ्यासोबत असतेस तेव्हा मला कुठेही घरी असल्यासारखे वाटते.” विराटच्या या फोटोला खूप पसंती मिळत आहे. एका तासात २० लाखांहून अधिक युजर्सनी या फोटोला लाइक केले आहे. या फोटोत दोघेही नदीच्या काठावर बसलेले दिसत आहेत. दुरूनच फोटो क्लिक करण्यात आला आहे.
विराटच्या या कॅप्शनवर अनुष्का शर्माने मजेशीर उत्तर दिले. ”ही चांगली गोष्ट आहे कारण तू क्वचितच घरी असतोस”, असे अनुष्काने आपल्या उत्तरात म्हटले. अनुष्काच्या या उत्तरावर जवळपास १७ हजार लाइक्स आहेत.
हेही वाचा – IND vs NZ : ‘‘अच्छा तो हम चलते है…”, रहाणे-पुजारा पुन्हा फ्लॉप; नेटकऱ्यांनी दिला ‘असा’ निरोप!
३३ वर्षीय विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. याआधी त्याने जिममध्ये व्यायाम करतानाची व्हिडिओही शेअर केला होता. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात विराट कोहली भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसला. मात्र, टीम इंडियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही. दरम्यान, त्याने या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले. आता तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.