येत्या २७ ऑगस्टपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातून विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सरावासाठी वापर सुरू केला आहे. त्याने आशिया चषकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओतून त्याची तयारी लक्षात येते.

आशिया चषकाच्या तयारीसाठी विराट कोहली सध्या तासनतास जिममध्ये घाम गाळत आहेत. जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंवर पोस्ट केला आहे. अल्पावधीतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. आशिया चषक ही स्पर्धा विराट कोहलीसाठी फॉर्ममध्ये येण्याची महत्त्वाची संधी असणार आहे. कारण, आशिया चषकाकडे टी २० विश्वचषकाची रंगीत तालिम म्हणून बघितले जात आहे.

Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

‘रनमशीन’ अशी ओळख असलेला कोहली गेल्या काही काळापासून अतिशय वाईट फॉर्मशी झगडत आहे. २०१९पासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही. गेल्या चार टी २० सामन्यांमध्ये तर त्याने केवळ ८१ धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामातही त्याला विशेष कामगिरी करता आली नाही.

हेही वाचा – शिखर धवन, शुबमन गिल अन् ईशान किशनची झिम्बाब्वेत धमाल; Video बघून तुम्हालाही आवरणार नाही हसू

२०२१ टी-२० विश्वचषकानंतर कोहलीला त्याच्या कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी अनेकदा विश्रांती देण्यात आली आहे. अलीकडेच त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यातूनही विश्रांती देण्यात आली होती. शिवाय, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातही त्याचा समावेश केलेले नाही. आता त्याचा जिममधील व्हिडिओ बघून तो लवकरच फॉर्ममध्ये येईल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.