Virat Kohli tells Biggest Myth in World In Viral Video Gears up For IND vs BAN After IND vs NZ ODI | Loksatta

Video: ‘ही’ जगातील सर्वात मोठी चूक.. विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओत दिलं थेट उत्तर

Virat Kohli Viral Video: शिखर धवनच्या नेतृत्वात आजपासून एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर राहून विराट कोहली सध्या विश्रांती घेत आहे.

Virat Kohli tells Biggest Myth in World In Viral Video Gears up For IND vs BAN After IND vs NZ ODI
Video: 'ही' जगातील सर्वात मोठी चूक.. विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओत दिलं थेट उत्तर (फोटो: संग्रहित)

Virat Kohli Fitness Viral Video: एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडशी सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्ल्यूने टी २० सामन्यांमध्ये १-० असा विजय मिळवला होता तर आता शिखर धवनच्या नेतृत्वात आजपासून एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर राहून विराट कोहली सध्या विश्रांती घेत आहे. टी २० विश्वचषकात विराटच्या तुफानी खेळीने भारताला अनेक सामने जिंकून दिले होते मात्र अखेरीस सेमी फायनलमध्ये इंग्लंडसमोर भारताची जादू चालली नाही व टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर पडली यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के. एल. राहुल व विराट कोहली या मुख्य खेळाडूंना विश्रांतीसाठी ब्रेक देण्यात आला होता. या विश्रांतीचा पुरेपूर वापर करून विराटने पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

३४ वर्षीय विराट कोहली हा आपल्या फिटनेससाठीही ओळखला जातो. गुरुवारी जिममध्ये घाम गालात असताना त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘Back At It’ अशा कॅप्शनसह या व्हिडिओमध्ये कोहली ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. जर तुम्ही कोहलीला फॉलो करत असाल तर त्याने अनेक व्हिडीओजमधून हे सांगितले आहे की, कोहली व अनुष्का हे दोघेही पूर्णतः शाकाहारी आहेत, यावरूनच सध्या व्हायरल होणाऱ्या कोहलीच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली होती.

कोहलीच्या पोस्टवर फॅन म्हणाला की, “आणि लोकं असं सांगतात की तुम्ही मांस खाल्ले नाही तर तुम्ही मस्क्युलर होऊ शकत नाही,” याच कमेंटवर स्वतः कोहलीने उत्तर देत म्हंटले की, हा जगातील सर्वात मोठा गैरसमज आहे. विशेष म्हणजे कोहली हा स्वतः आधी मांसाहारी होता मात्र काही वर्षांपूर्वी पत्नी अनुष्का शर्मासह त्याने आरोग्याच्या कारणासाठी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहली व्हायरल व्हिडीओ

हे ही वाचा<< मी बिनपगारी…विराट कोहलीची ‘ती’ इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत; Viral Video मध्ये नेमकं आहे तरी काय?

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यांसाठी बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना ४ डिसेंबरला खेळला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 08:52 IST
Next Story
सामना सुरू असतानाच आला हार्ट अटॅक, मृत्यूवर मात करून पुन्हा खेळायला उतरला! डॅनिश फुटबॉलपटूचा अविश्वसनीय संघर्ष!