Virat Kohli cryptic one-word three posts on X : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी एक दिवस आधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आला आहे. तो बुधवारी सकाळी एक्सवर तीन शब्द ट्वीट केल्यानंतर चर्चेत आला आहे. जे पाहून चाहतेही गोंधळले. विराटने हे तीन ट्वीट कोणावर केले हे चाहत्यांना समजू शकलेले नाही. काही चाहत्यांनी असेही विचारले आहे की, एवढ्या सकाळी अशा प्रकारचे शब्द ट्वीट करण्याचे काय कारण आहे?
विराट कोहली बहुतेक सोशल मीडियावर जाहिराती पोस्ट करतो किंवा तो त्याच्या चाहत्यांसह क्रिकेटशी संबंधित पोस्ट देखील शेअर करतो. परंतु बुधवारी सकाळी-सकाळी त्याने केलेल्या चार ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराटने हे तीन ट्वीट कोणाबद्दल केले हे चाहत्यांना समजू शकलेले नाही. विराट कोहलीने एका पाठोपाठ एका ट्विटमध्ये Kindness (दयाळूपणा), Chivalry (महिलांचा आदर करणारे पुरुष), Respect (सन्मान) असे लिहिले असले तरी याशिवाय विराटने दुसरी कोणतीही पोस्ट केलेली नाही.
विराट कोहलीने यावर्षी फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता आणि या दौऱ्यावर विराटने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर विराटने फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत भाग घेतला नव्हता. त्यानंतर विराट कोहली त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत होता.
विराट कोहलीच्या पोस्टवर आलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
विराट कोहलीने भारतासाठी आतापर्यंत ११३ कसोटी सामने खेळले असून यादरम्यान त्याने ४९.१५ च्या सरासरीने ८८४८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २९ शतके आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.