भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या बिनधास्त शैलीसाठी ओळखला जातो. मैदानात आक्रमक खेळणारा सेहवाग निवृत्तीनंतरही आपल्या बोलण्याने टीकारकारांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचे आपण पाहतो. आता त्याने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने या स्पर्धेच्या विजेत्या संघाचे नाव सांगितले. .

विशेष म्हणजे सध्याच्या टी-२० विश्वचषकातील सर्व सामन्यांवर सेहवाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणत्या संघात किती ताकद आहे आणि यावेळी चॅम्पियन होण्याचा सर्वात मोठा दावेदार कोण? या गोष्टींवर सेहवाग सतत आपले मत मांडत असतो. सुपर १२ चे सामने आता शेवटच्या फेरीत पोहोचले आहेत.

हेही वाचा – T20 WC : हिंदी बोलण्यास नकार दिलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूची पंजाबी भाषेत कॉमेंट्री; VIDEO व्हायरल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Veerugiri.com या फेसबुक पेजवरील आपल्या खास कार्यक्रमात सेहवागने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना विश्वचषकाबाबतचे भाकीत सांगितले. तो म्हणाला, ”मला एका बाजूने पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूने कदाचित इंग्लंड संघ फायनल खेळेल असे वाटते. कदाचित इंग्लंड संघ हा विश्वचषक जिंकेल असे मला वाटते.”

सेहवागचे म्हणणे खरे ठरू शकते. इंग्लंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत प्रत्येक विभागात त्यांना यश मिळत आहे. आतापर्यंत विश्वचषकातील सुपर १२ मधील सर्व सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दुसरीकडे पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानच्या संघानेही आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत.