John Wright Grabbed Virender Sehwag’s Collar: भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यात न्यूझीलंडचे माजी दिग्गज जॉन राइट यांचा मोठा वाटा आहे. सौरव गांगुलीसारख्या सर्वोत्तम कर्णधारासोबत काम करताना भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलण्यात त्याचा मोठा वाटा होता. जॉन राइट २००० साली भारतीय क्रिकेट संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक बनले होते. त्यांच्यासोबत बरेच वाद झाले आहेत. भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागसोबतही त्यांचा वाद झाला होता. याबाबत स्वत: वीरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉन राइटच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारतीय संघाने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटी आणि इंग्लंडमधील नॅटवेस्ट ट्रॉफीसह अनेक संस्मरणीय विजय मिळवले. २००३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारतीय संघ पोहोचला होता. पण त्याच्याशी संबंधित अनेक वादही झाले आहेत. भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागसोबतही त्याची झटापट झाली होती.

याचा खुलासा खुद्द सेहवागने केला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीशी संबंधित एक किस्सा सांगितला. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात सेहवागने सांगितले की, २०० साली जॉन राईट टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना त्यांच्यासोबत वाद झाला होता. सेहवाग म्हणाला, ‘कोचसोबत बाचाबाची झाली होती आणि नॅटवेस्ट मालिकेदरम्यान जॉन राइटने माझी कॉलर पकडली आणि मला धक्का दिला होता.’

हेही वाचा – IND vs WI 1st T20: शिमरॉन हेटमायरच्या ‘या’ झेलने बदलले भारताचे नशीब, वेस्ट इंडिजने मारली बाजी, पाहा VIDEO

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “मग मी राजीव शुक्ला (टीम मॅनेजर) यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की हा गोरा माणूस असे कसे करू शकतो. त्यांनी ही गोष्ट सौरव गांगुली (कर्णधार) ला सांगितली. मग मी म्हणालो की जॉन राईट माफी मागत नाही, तोपर्यंत कोणताही तोडगा निघणार नाही. मग तो माझ्या खोलीत आला आणि माफीही मागितली. त्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला की, सेहवाग-राइटची ही बाब भूतकाळात सोडली पाहिजे. ते बाहेर आणू नये. त्यानंतर हा विषय निघाला नाही.”

भारतीय संघात चिठ्ठी सिस्टीम चालायची –

सेहवागने सांगितले की, संघात कोण ओपन करायचे हे ठरवण्यासाठी चिठ्ठी सिस्टीम असायची. ज्याच्या नावाला जास्त मते पडायची, ती जोडी सलामीला जायची. सेहवागने २००३ विश्वचषकादरम्यान सौरव गांगुलीला सलामीवीर म्हणून कसे वगळण्यात आले ते सांगितले. तो म्हणाला, “संघात चिठ्ठी सिस्टीम होती. सर्व खेळाडूंना विचारण्यात आले की सलामीला कोणी जावे? सचिन-सेहवागने सलामीला जावे, असे १४ खेळाडूंनी लिहिले होते. सचिन-गांगुलीने सलामीला जावे, असे एका चिठ्ठीत लिहिले होते. ती चिठ्ठी सौरव गांगुलीने लिहिली होते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag revealed that john wright grabbed his collar and dragged him vbm
First published on: 04-08-2023 at 15:36 IST