भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आपल्या कारकिर्दीत फटकेबाजीमुळे चर्चेत असायचा. निवृत्तीनंतर हल्ली तो त्याच्या सोशल मिडियावरील शाब्दिक फटकेबाजीमुळे चर्चेत असतो. कोणत्याही संवेदनशील विषयावर अतिशय मिस्कीलपणे भाष्य करण्याची कला सेहवागला अवगत आहे. चाहत्यांनाही त्याच्या या हटके ट्विट्सचा प्रत्यय वारंवार आला आहे. पण यावेळी सेहवागने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील धमाल त्याने अतिशय मजेशीर पद्धतीने मांडली आहे.

सेहवागने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका गावात जोरदार पार्टी सुरू आहे. त्यात एक वयस्क माणूसही तरूणांच्या खांद्याला खांदा लावून नाचताना दिसत आहे. तो माणूस नाचत असतानाच अचानक तो माणूस घाबरतो आणि पळायला लागतो. नक्की काय झालं? हे काही काळ कळत नाही. पण नंतर एक म्हातारी बाई हातात काठी घेऊन त्या माणसाच्या मागे धावताना दिसते. त्यानंतर सगळा उलगडा होता.

पाहा तो व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओबद्दल कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिले आहे, “वय हे सारखं बदलत असतं. पण बायकोने उगारलेली काठी (बिवी की लाठी) ही कायमच धडकी भरवणारी असते!” या कॅप्शनमध्ये त्याने बायकोची भीती असा हॅशटॅगदेखील वापरला आहे. त्याचसोबत, नवरा-बायकोची ही कथा सगळीकडे सारखीच आहे असंही नमूद केलं आहे.