कोणताही क्रिकेटपटू महान केव्हा ठरतो? या प्रश्नाचं साधं-सरळ उत्तर म्हणजे त्याच्या कामगिरीवरून. अर्थात, त्याच्या आकड्यांवरून त्या खेळाडूची कामगिरी पाहिली जाते आणि त्या कामगिरीवरून त्या खेळाडूची महत्ता! गोलंदाजांसाठी ही आकडेवारी मिळवलेल्या बळींची किंवा बळींसाठीच्या सरासरीची असते. तर फलंदाजांसाठी ही आकडेवारी त्यांनी केलेल्या धावा आणि त्या धावांसाठीच्या सरासरीवर अवलंबून असते. क्रिकेटची ‘पाठशाला’ समजल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये धावांची सरासरी फार महत्त्वाची मानली जाते. पण जगातले असेही काही फलंदाज आहेत, ज्यांची सरासरी कमी असूनही ते त्यांच्या काळाततले महान क्रिकेटपटू ठरले! नेमके कोण आहेत हे अवलिया फलंदाज?

विराट कोहली हे नाव गेले दीड दशक अक्षरश: धावांची टांकसाळ उघडून आहे. तो खेळायला उतरणं म्हणजे धावांची हमी आहे. तो विकेट टाकत नाही. तो प्रत्येक धावेचं मोल जाणतो. एकेका धावेसाठी जीव तोडून पळतो. मैदानाच्या खाचाखोचांची त्याला पक्की जाण असते. कोणाला लक्ष्य करायचं हे त्याला माहिती असतं. कुठे फटका लगावला, तर चौकार-षटकार मिळतील याचं त्याचं गणित चोख असतं. कधी आक्रमक व्हायचं, कधी आदर द्यायचा हे त्याला कळतं. तो ऑटो पायलट मोडवर खेळतो. त्याची बॅट तळपली की, संघ जिंकतो. तो दमत नाही, कंटाळत नाही. त्याची धावांची भूक भस्म्या ड्रॅगनची आहे. त्यामुळे त्याचं संघात नसणं किंवा त्याची बॅट रुसणं मनाला वेदना देतं. करोना काळात अडीच वर्षं त्याची बॅट म्यान झाली होती. शतक त्याला दूर ठेवत होतं. पन्नाशीपल्याड सरासरी मळवट अभिमानाने फडकत असे. पण, मधल्या काळात त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी झाला. सरासरी ५० च्या खाली गेली. खरं तर शेकडो सामने खेळल्यावरही सरासरी ५० च्या घरात आहे हे विलक्षण सातत्याचं द्योतक; पण मोठ्या खेळाडूंना मोठी शिखरं साद घालतात. सरासरी अर्धशतकाच्या पल्याड आहे का अल्याड यानं कोहलीच्या कर्तृत्वसिद्धतेत तसूभरही फरक पडत नाही. आधुनिक क्रिकेटचा शिलेदार ही बिरुदावली त्याच्या नावाला शोभून दिसते.

With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग

२०१९ पूर्वी विराटची कसोटी सरासरी ही ५८ पेक्षा जास्त होती. परंतु, आता ही सरासरी ५० पेक्षा कमी झाली आहे. या गोष्टीची खूप चर्चा झाली. विराटच्या कामगिरीत सातत्य नसल्याची टीकाही झाली. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये ५० च्या सरासरीला इतकं महत्त्व का दिलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच जगात असे काही महान कसोटी फलंदाज आहेत; ज्यांची कसोटीतली सरासरी ५० पेक्षा कमी आहे. तरीदेखील जगातल्या महान फलंदाजांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. या लेखात आपण या महान फलंदाजांबद्दल आणि कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंच्या सरासरीबाबत ऊहापोह करणार आहोत.

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीचा ऊहापोह करण्यापूर्वी त्याने पदार्पणापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी कितीच्या सरासरीने धावा जमवल्या आहेत ते पाहू.

पदार्पणापासून २०१९ पर्यंत विराटची कसोटीतली सरासरी

२०११ – – सरासरी २२.४४
२०१२ – सरासरी ४९.२१
२०१३ – सरासरी ५६.००
२०१४ – सरासरी ४४.५८
२०१५ – सरासरी ४२.६७
२०१६ – सरासरी ७५.९४
२०१७ – सरासरी ७५.६५
२०१८ – सरासरी ५५.०८
२०१९ – सरासरी ६८.००

२०१९ नंतर विराटच्या सरासरीत घसरण झाली. सध्या विराटने ११३ कसोटींच्या १९१ डावांमध्ये ४९.१ च्या सरासरीने ८,८४८ धावा जमवल्या आहेत. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये विराटच्या कामगिरीत घसरण झाली आहे.

२०२० पासूनची विराटची कसोटी क्रिकेटमधील सरासरी

२०२० – सरासरी १९.३३
२०२१ – सरासरी २८.२१
२०२२ – सरासरी २६.५०
२०२३ – सरासरी ५५.९२
२०२४ – सरासरी २९.००

सामनेडावधावासर्वश्रेष्ठ सरासरीशतकंअर्धशतकं
११३१९१८,८४८२५४*४९.१२९३०

५० च्या सरासरीला फार महत्त्व का दिलं जातं?

एखादा फलंदाज आणि गोलंदाजाच्या कारकिर्दीत शतक आणि फायफर (एका डावात पाच बळी) महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाची सरासरी ५० किंवा त्याहून अधिक असेल, तर त्याचा अर्थ तो फलंदाज सातत्याने धावा करतोय, असा होतो. ५० ची सरासरी ही एखाद्या फलंदाजाच्या सातत्यूर्ण कामगिरीचं द्योतक मानली जाते. एखाद्या फलंदाजाची एक-दोन मालिकांत किंवा वर्षभर ७०-८० किंवा त्याहून अधिक सरासरी असू शकते. परंतु, एखाद्या खेळाडूनं ५० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळल्यानंतरही त्याची सरासरी ५० पेक्षा जास्त राखली असेल, तर त्याचा अर्थ तो सातत्याने धावा करणारा फलंदाज आहे, असं मानलं जातं. अशी सरासरी राखण्यासाठी फलंदाजाला त्याच्या मायदेशात आणि विदेशांत प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर स्वत:ला सिद्ध करावं लागतं. आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर, दर्जेदार गोलंदाजीसमोर फलंदाजांची खरी परीक्षा होते. सर्व प्रकारच्या स्थितीत, सर्व प्रकारच्या गोलंदाजीविरोधात आणि सर्व देशांविरोधात उत्तम खेळाचं प्रदर्शन करावं लागतं.

गेल्या सव्वाशे ते दीडशे वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात केवळ ४३ खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ५० किंवा त्याहून अधिक सरासरीनं धावा जमवता आल्या आहेत. हे सर्व महान खेळाडू आहेत. या यादीतल्या काही प्रमुख खेळाडूंवर नजर टाकली तरी लक्षात येईल की, ५० च्या सरासरीला इतकं महत्त्व का दिलं जातं.

५० पेक्षा जास्त सरासरी राखणारे दिग्गज कसोटी फलंदाज

  1. डॉन ब्रॅडमन – ९९.९४
  2. हर्बर्ट सटक्लिफ – ६०.७३
  3. केन बॅरिंग्टन – ५८.६७
  4. वॅली हॅमंड – ५८.४५
  5. स्टीव्ह स्मिथ – ५८.०३
  6. गॅरी सोबर्स – ५७.७८
  7. कुमार संगकारा – ५७.४०
  8. जॅक कॅलिस – ५५.३५
  9. केन विलियम्सन – ५५.१२
  10. ग्रेग चॅपेल – ५३.८६
  11. सचिन तेंडुलकर – ५३.७८
  12. ब्रायन लारा – ५२.८८
  13. जावेद मियाँदाद – ५२.५८
  14. राहुल द्रविड – ५२.३१
  15. मोहम्मद युसूफ – ५२.२९
  16. युनिस खान – ५२.०५
  17. रिकी पॉंटिंग – ५१.८५
  18. अँडी फ्लॉवर – ५१.५४
  19. सुनील गावसकर – ५१.१

…म्हणून हे खेळाडू महान ठरतात!

या सर्व खेळाडूंनी एक किंवा दोन तपं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एक तप एखाद्या खेळाडूनं सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळेच त्या खेळाडूला त्याची सरासरी ५० पेक्षा जास्त राखता आली आहे. या खेळाडूंची एक खासियत असते की, एखादी मालिका किंवा एखादं वर्ष त्यांना धावा जमवता आल्या नाहीत तरीदेखील हे खेळाडू त्याच्या पुढच्या वर्षी खोऱ्यानं धावा जमवून आपली सरासरी संतुलित ठेवतात. उदाहरणार्थ- विराट कोहली सलग तीन वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरत होता. अडीच वर्षांत त्यानं एकही शतक झळकावलं नाही. तरीदखील त्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ४९ पेक्षा अधिक आहे. कारण- त्यानं २०१९ पूर्वी खोऱ्यानं धावा जमवल्या आहेत. त्यामुळेच त्याला ‘रनमशीन’, असं म्हटलं जातं. असा खेळाडू नसला की, संघाला त्याची प्रकर्षानं उणीव भासते. गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीशिवाय कसोटी खेळणारा भारतीय संघ चाचपडताना दिसला आहे. त्याचप्रमाणे केन विलियम्सन अलीकडे दुखापतीमुळे संघाबाहेर होता तेव्हा न्यूझीलंडच्या संघाची दुर्दशा झाली होती. विलियम्सनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडसारखा बलाढ्य संघ मायदेशात बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाविरोधात पराभूत झाला होता. ही सर्व कारणं आणि सातत्यपूर्ण कामगिरी यांमुळे या खेळाडूंना महान म्हटलं जातं.

५० पेक्षा कमी सरासरी असणारे दिग्गज फलंदाज

१. एल्विन कालीचरण

ज्यांनी एल्विन कालीचरण या दिग्गज क्रिकेटपटूला फलंदाजी करताना पाहिलं आहे, असे क्रिकेटरसिक एल्विनचा जगातला महान क्रिकेटपटू म्हणून उल्लेख करतात. ७० च्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये कालीचरणचा दबदबा होता. १९७५ च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत त्यानं डेनिस लिली याची धुलाई केल्याचं जगानं पाहिलं होतं. त्या काळात लिली हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. परंतु, कालीचरणचं फलंदाजीतलं वैविध्य लिलीपेक्षा सरस ठरलं. विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात कालीचरणनं डेनिस लिलीच्या १० चेंडूंवर ३५ धावा कुटल्या होत्या. कालीचरणनं त्याच्या कारकिर्दीत ६६ कसोटी सामन्यांमध्ये ४४.४३ च्या सरासरीनं ४,३९९ धावा जमवल्या आहेत. वरवर ही आकडेवारी एका सामान्य फलंदाजाची आहे, असं वाटतं. परंतु, कालीचरणच्या फलंदाजीत जितकं वैविध्य होतं तशी आकडेवारी दिसत नाही, त्याचबरोबर त्याला तितकासा सन्मान मिळाला नाही, असं मत त्याचे चाहते मांडतात.

कालीचरणची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ५० नसणं हे त्यामागचं एक कारण आहे. सध्याच्या जलद क्रिकेटमध्ये ५० ची सरासरी उत्तम मानली जाते. परंतु, कालीचरणप्रमाणे असे इतरही अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या देशासाठी अनेक सर्वोत्तम खेळी साकारल्या आहेत, खोऱ्यानं धावा जमवल्या आहेत, शतकं ठोकली आहेत. परंतु, त्यांची कसोटीतली सरासरी ५० पेक्षा कमी आहे. आज आम्ही अशा काही क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत; ज्यांनी ५० हून अधिक कसोटी धावा जमवल्या आहेत; मात्र त्यांची कसोटीतली सरासरी ५० पेक्षा कमी आहे. (PC : ICC)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
६६१०९४,३९९१८७४४.४१२२१

२. रोहन कन्हाय

कसोटी क्रिकेटमधील दिग्गजांच्या यादीत रोहन कन्हाय या खेळाडूचं नाव आदरानं घेतलं जातं. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर रोहन कन्हायच्या इतके प्रेमात होते की, त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव रोहन ठेवलं आहे. गावसकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला होता. गावसकर यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलं आहे, “रोहन कन्हायपेक्षा श्रेष्ठ खेळाडू मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही.” हूक शॉटचा जन्मदाता म्हणून रोहन कन्हायची जगभर ओळख आहे. ६० च्या दशकात रोहन कन्हायचा जागतिक क्रिकेटवर वरचष्मा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये रोहनची सुरुवात थोडी धीम्या गतीनं झाली. परंतु, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताविरुद्ध २५६ धावांची खेळी साकारल्यानंतर त्याला सूर गवसला. त्यानंतर त्यानं परत कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानं त्या काळातल्या प्रत्येक संघाविरोधात खोऱ्यानं धावा जमवल्या.

रोहन कन्हायनं ७९ कसोटी सामन्यांच्या १३७ डावांमध्ये १५ शतकं आणि २८ अर्धशतकांच्या मदतीनं ६,२२७ धावा फटकावल्या. परंतु, या काळात त्याची सरासरी ४७.५ इतकी होती. (PC : ICC)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
७९१३७६,२२७२५६४७.५१५२८

३. व्हीव्हीएस लक्ष्मण

मनगटी खेळाचा जादूगार, अशी जगभर ख्याती असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणची भारताच्या सर्वकालीन दिग्गज कसोटी फलंदाजांमध्ये नोंद घेतली जाते. २००० च्या दशकात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जगभरात दहशत होती. त्या काळात लक्ष्मणनं याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खोऱ्यानं धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची त्यानं धुलाई केली. त्याचा कारकिर्दीतली २८१ धावांची सर्वोच्च खेळी त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध साकारली होती. ११-१५ मार्च २००१ रोजी ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यानंतर लक्ष्मणनं कारकिर्दीत परत कधीच मागे वळून पाहिलं नाही. निवृत्तीपर्यंत तो पूर्णवेळ भारतीय संघाचा सदस्य होता. २८१ च्या खेळीनंतर लक्ष्मण भारतीय संघाचा अविभाज्य घटक झाला तो कायमचाच. तरीदेखील जगातल्या सर्वांत महान फलंदाजांमध्ये लक्ष्मणचं नाव घेतलं जात नाही.

क्रिकेट समीक्षकांच्या मते- लक्ष्मण त्याच्या अर्धशतकी खेळीचं शतकामध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरायचा. परंतु, बरेच जण एक गोष्ट विसरतात की, लक्ष्मण पाचव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात यायचा. लक्ष्मणच्या आधी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर हे फलंदाज मैदानात यायचे. त्यामुळे लक्ष्मणला वरच्या फलंदाजांच्या तुलनेत कमी वेळ मिळायचा. पाचव्या, सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजासाठी ४५-४६ ही उत्तम सरासरी आहे. लक्ष्मणनं १३४ कसोटी सामन्यांमध्ये १७ शतकं व ५६ अर्धशतकांच्या मदतीनं आणि ४६ च्या सरासरीनं ८,७८१ धावा जमवल्या आहेत. (PC : indian Express)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
१३४२२५८,७८१२८१४६१७५६

४. गॅरी कर्स्टन

गॅरी कर्स्टन हे नाव जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांच्या परिचयाचं आहे. गॅरी हा भारतीयांचादेखील लाडका आहे. कारण- गॅरी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असताना भारतानं २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. प्रशिक्षक म्हणून गॅरीचा जगभर दबदबा आहे. त्याचबरोबर फलंदाज म्हणूनही दक्षिण आफ्रिकेच्या संघातला तो उजवा खेळाडू होता. १९९९-२००० मध्ये इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. त्यावेळी डरबान येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात गॅरीनं प्रत्येक फलंदाजाला हेवा वाटावा अशी खेळी साकारली होती. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ २१० धावांनी पिछाडीवर होता. त्यावेळी सामना वाचवण्यासाठी कोणीतरी मैदानात नांगर टाकून उभं राहणं आवश्यक होतं. दक्षिण आफ्रिकेला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी गॅरी कर्स्टन धावून आला. चौथ्या डावात फलंदाजी करताना त्यानं तब्बल ८४८ मिनिटं फलंदाजी केली. त्यानं ६४२ चेंडूंत २७५ धावा फटकावल्या.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गॅरीनं अनेक चढ-उतार पाहिले. परंतु, ९४-९५ सालानंतर तो त्याच्या संघाचा कणा बनला. गॅरीनं कारकिर्दीतल्या १०१ कसोटी सामन्यांमध्ये २१ शतकं आणि ३४ अर्धशतकांच्या मदतीनं तब्बल ७,२८९ धावा जमवल्या. या काळात त्याची सरासरी ४५.२७ इतकी होती. एक महान प्रशिक्षक म्हणून जगानं गॅरीची नोंद घेतली असली तरी महान फलंदाज म्हणून त्याला स्थान दिलं जात नाही. याला त्याची कसोटीतली सरासरी जबाबदार आहे, असं म्हटलं जातं. गॅरी तरुण असताना ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळायचा त्यापेक्षा अधिक आक्रमक रूप त्याच्या कारकिर्दीच्या उतरार्धात पाहायला मिळालं. (PC : indian Express)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
१०११७६७,२८९२७५४७.३२१३४

५. जस्टिन लँगर

ऑस्ट्रेलियामधील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये जस्टिन लँगरचं नावदेखील घेतलं जातं. लँगरनं २००० मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरोधात खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक झळकवल्यानंतर तत्कालीन ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह वॉ यानं लँगरचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसेच तो जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याची पावती दिली होती. लँगरनंही आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक उत्तम खेळी साकारून तो जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचं दाखवून दिलं आहे. परंतु, लँगर हा नेहमीच त्याच्यापेक्षा अधिक प्रतिभावान सहकाऱ्यांच्या सावलीत राहिला. त्यामुळे त्याचं म्हणावं तसं कौतुक कधीच झालं नाही. १९९३ मध्ये त्यानं अ‍ॅडलेड येथे कसोटी पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज इयान बिशपचा बाऊन्सर त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला; परंतु लँगरनं माघार घेतली नाही. त्या सामन्यात त्यानं महत्त्वाची अर्धशतकी खेळी साकारली. लँगरनं १३ वर्षं ऑस्ट्रेलियन क्रिकेटची सेवा केली.

लँगरनं २००४ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच वर्षी त्यानं त्याचा सर्वोत्तम खेळ दाखवला होता. या वर्षभरात त्यानं तब्बल १,४८१ धावा चोपल्या. डिसेंबर २००४ मध्ये पर्थ येथे खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (लँगरचा अखेरचा सामना) त्यानं १९१ धावांची खेळी साकारली होती. १०५ कसोटी सामन्यांमध्ये त्यानं २३ शतकं आणि ३० अर्धशतकांच्या मदतीनं ७,६९६ धावा फटकावल्या. परंतु, या काळात त्याची सरासरी ४५.३ इतकी होती. २५० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. (PC : indian Express)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
१०५१८२७,६९६२५०४५.३२३३०

६. मार्टिन क्रो

८० च्या दशकात न्यूझीलंड संघाचा कणा म्हणून ख्याती असलेला मार्टिन क्रो हा एक सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून ओळखला जातो. क्रोनं निवृत्ती घेतली तेव्हा न्यूझीलंडसाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्याच नावावर होता. तसेच डावात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही त्याच्याच नावावर होता. १९९१ मध्ये वेलिंग्टन येथे श्रीलंकेविरोधात त्यानं २९९ धावांची खेळी साकारली होती. पाकिस्तानचे वसिम अक्रम व वकार युनूस हे गोलंदाज त्यांच्या धडकी भरवणारा वेग आणि स्विंग गोलंदाजी यांच्या जोरावर समोरच्या फलंदाजाची भंबेरी उडवत होते, त्याच काळात मार्टिन क्रो या दोन्ही गोलंदाजांची लीलया धुलाई करायचा. रिव्हर्स स्विंग गोलंदाजीविरोधातही सहज धावा जमवायचा.

मार्टिन क्रो एक धडाकेबाज फलंदाज होता; परंतु तरीही त्याची कसोटीतली सरासरी कधी ५० च्या पुढे गेली नाही. मार्टिन क्रोनं ७७ कसोटी सामन्यांमध्ये १७ शतकं आणि १८ अर्धशतकांच्या मदतीनं तब्बल ५,४४४ धावा जमवल्या. या काळात त्याची सरासरी ४५.४ इतकी होती. मार्टिन क्रो यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येदेखील २० हजार धावा जमवल्या आहेत. (PC : indian Express)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
७७१३१५,४४४२९९४४.६१७१८

७. वीरेंद्र सेहवाग

नजफगडचा नवाब व मुलतानचा सुलतान, अशी जगभर ख्याती असलेला भारताचा दिग्गज क्रिकेटपटू म्हणजेच वीरेंद्र सेहवागचं नावही या यादीत आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत वर्चस्व गाजवणाऱ्या सेहवागनं भारतासाठी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं त्रिशतक झळकवलं. त्यानंतरही दोन त्रिशतकं झळकवण्याचा मान त्याच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्येदेखील ८० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने वीरेंद्र सेहवागनं तब्बल आठ हजारांहून अधिक धावा जमवल्या आहेत. मार्च २००८ मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सेहवागनं अवघ्या ३०४ चेंडूंत ३१९ धावा फटकावल्या होत्या. १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं त्रिशतक झळकवण्याचा विक्रम आजही सेहवागच्या नावावर आहे. तसेच एप्रिल २००४ मध्ये पाकिस्तानच्या मुलतान येथे सेहवागनं ३७५ चेंडूंत ३०९ धावांची खेळी साकारली होती. सेहवागच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १७ हजार धावा आहेत; तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं १०४ सामन्यांमध्ये २३ शतकं आणि ३२ अर्धशतकांच्या मदतीनं ८,५८६ धावा जमवल्या आहेत.

जगात सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या या खेळाडूची सरासरी मात्र ५० पेक्षा कमी होती. सेहवागनं या धावा ४९.१ च्या सरासरीनं जमवल्या आहेत. सेहवागनं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतकंदेखील झळकवली आहेत. दोन त्रिशतकासंह सहा द्विशतकं, ८० पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट असणाऱ्या या खेळाडूच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळेच त्याचं नाव या यादीत आहे. (PC : indian Express)

सामनेडावधावासर्वश्रेष्ठसरासरीशतकंअर्धशतकं
१०४१८०८,५८६३१९४९.३२३३२

बऱ्याचदा आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या नादात सेहवाग बाद व्हायचा. एखादं शतक, द्विशतक झळकवल्यानंतर पुढच्या सामन्यात अपयशीदेखील ठरायचा. त्यामुळेच त्याची सरासरी ५० पेक्षा कमी आहे.