भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून टेरी वॉल्श अचानक दूर झाले असले, तरी आगामी चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी करून दाखवू, असा आत्मविश्वास भारतीय हॉकी संघातील अनुभवी खेळाडू रमणदीप सिंगने व्यक्त केला. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा भुवनेश्वर येथे ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.  
रमणदीप म्हणाला, ‘‘वॉल्श अचानक दूर झाले असले तरी ओल्टमन्स हे आमच्यासमवेत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सध्या सराव करीत आहोत. मायकेल नॉब्ज यांच्यापेक्षा वॉल्श हे कितीतरी पटीने अव्वल दर्जाचे प्रशिक्षक आहेत. ’’
एअर इंडियाला पराभवाचा धक्का